सहकार महर्षी दादापाटील राजळे वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना नामकरण करा.- राजळे
नगर सिटीझन टिम प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील आदिनाथनगर येथील वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या ५१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सभासद शेतकऱ्यांच्या वतीने प्रशासनाला मागण्या माजी जिल्हा परीषद सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे यांनी केल्या.साखर
कारखान्याच नामकरण सहकारमहर्षी दादापाटील राजळे वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना असे करावे.साखर कारखाना सुरु करण्यामध्ये तसेच ही यञंणा यशस्वी पार पडण्यासाठी सहकार महर्षी स्व.दादापाटील राजळे यांची भुमिका महत्त्वाची होती.त्यांनी सहकाराच्या माध्यमातून परीसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध करुन दिला.असे यावेळी ज्ञानदेव जगताप यांनी सांगितले.
मागील वर्षी ऊस तोडणी उशिरा झाल्याने शेतकऱ्यांना मोठा तोटा झाला त्यामुळे यावेळी परिसरातील उसतोडीला प्राधान्य द्यावे.
पुढील वर्षी कारखान्याचे 1000 एमटी एक्सपांशन (क्रशिंग कॅपॅसिटी वाढवणे) करावे.मयत झालेल्या सभासदाच्या वारसांना तातडीने सभासदत्व द्यावे
एफआरपी रक्कम तुकड्याने न देता एकरकमी द्यावी.
पुढील वर्षीच्या इथेनॉल साठीच्या कपातीसंदर्भात ऊस उत्पादकाना स्पष्ट माहिती द्यावी.
कार्यकारी संचालकांची तातडीने नियुक्ती करावी.अशा मागण्या यावेळी राजळे यांनी केल्या.यावेळी साखर कारखाना चेअरमन आप्पासाहेब राजळे, व्हा.चेअरमन रामकिसन काकडे, आ.मोनिकाताई राजळे, तसेच सर्व संचालक मंडळ यावेळी उपस्थित होते.