पागोरी पिंपळगाव सेवा सहकारी सोसायटीवर ढाकणे गटाचे वर्चस्व
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील पागोरी पिंपळगाव सेवा सहकारी सोसायटीवर केदारेश्वर साखर कारखान्याचे चेअरमन प्रतापराव ढाकणे गटाने बाजी मारत सर्व जागा जिंकून सोसायटीवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले.विरोधी भाजपच्या गटाचा धुवा उडवत संस्थेवर ढाकणे सर्मथकांनी १३ जागा जिंकल्या.
नुकत्याच झालेल्या निवडणुकीत पागोरी पिंपळगाव सोसायटीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सिद्धेश्वर शेतकरी सहकारी पॅनलचे बाळू घनवट,रामदास दराडे, लक्ष्मण दराडे, प्रल्हाद नागरे,पंडित नागरे,मन्सूर पटेल,ख्वाजामिया पठाण,निसार शेख,बबन शिरसिम,मंगल गर्जे,गंगुबाई दराडे,गणेश भडके व आजिनाथ दराडे यांनी मोठ्या फरकाने विरोधी भाजपच्या उमेदवारांचा पराभव केला.
निकाल लागल्यानंतर गावात गुलाल उधळून जल्लोष करण्यात आला. तसेच विजयी उमेदवारांनी माजी मंत्री बबनराव ढाकणे यांची भेट घेतली.यावेळी ढाकणे यांनी सर्वांचा सत्कार केला व मार्गदर्शन केले.
पागोरी पिंपळगाव सोसायटी तालुक्यातील महत्वाची संस्था असून या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.तालुक्यात आजपर्यंत झालेल्या अनेक सोसायट्यावर ढाकणे गटाचे वर्चस्व प्रस्थापित केले असून सहकारी क्षेत्रामध्ये होत असलेले हे बदल आगामी सर्व मोठ्या निवडणुकांत परिवर्तनाची नांदी ठरणार, असे प्रतापराव ढाकणे यांनी सांगितले.