जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये गुरू माऊली मंडळाने बाजी मारली
चौथ्या स्थानावर राहीले सदिच्छा मंडळ
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
जिल्हाभर गाजलेल्या जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पंचवार्षिक निवडणुकीमध्ये शिक्षक नेते बापुसाहेब तांबे यांच्या नेतृत्वाखाली गुरु माऊली मंडळाने बाजी मारत शिक्षक बैंक विकास मंडळावर सत्ता मिळवली .
जिल्हा बँकेत एकहाती सत्ता मिळवत बापुसाहेब तांबे यांनी विरोधी मंडळाच्या सर्वांना धोबीपछाड दिली. विकास मंडळ व शिक्षक बँकेत बापूसाहेब तांबे गटाचे सर्व संचालक मोठ्या मताधिक्याने निवडून आले. दुसऱ्या क्रमांकाची रावसाहेब रोहकले यांच्या मंडळाला मिळाली. तिसऱ्या स्थानावर संजय कळमकर यांचे गुरूकुल आणि चौथ्या स्थानावर राजेंद्र शिंदे यांचे सदिच्छा मंडळ राहीले
सविस्तर माहिती विजयी उमेदवार पुढील प्रमाणे शिक्षक बँक विजयी उमेदवार भाऊसाहेब राहिंज (संगमनेर), महेंद्र भणभणे (अहमदनगर), सुर्यकांत काळे (पारनेर), शशिकांत जेजुरकर (कोपरगांव), योगेश वाघमारे (राहाता), बाळू सरोदे (श्रीरामपूर), संतोषकुमार राऊत (जामखेड), कल्याण लवांडे (पाथर्डी), गोरक्षनाथ विटनोर (राहुरी), रमेश गोरे (शेवगांव), संदीप मोटे (श्रीगोंदा), अण्णासाहेब आभाळे (अकोला), रामेश्वर चोपडे (नेवासा), बाळासाहेब तापकिर (कर्जत), माणिक कदम (न.पा.नोन टीचिंग), मिनाज शेख (न.पा.नोन टीचिंग), कैलास सारोक्ते (अनुसूचित जाती जमाती),सरस्वती घुले (महिला राखीव), कारभारी बाबर (इतर मागासवर्गीय), ज्ञानेश्वर शिरसाठ(भटक्या जाती).
विकास मंडळाचे विजयी उमेदवार हे पुढील प्रमाणे संजय शेंडगे (संगमनेर), राजेंद्र निमसे (अहमदनगर), प्रल्हाद भालेकर (पारनेर), विकास गवळी (कोपरगांव), बाळासाहेब गमे (राहाता), प्रदिप दळवी (श्रीरामपूर), मुकुंदराज सातपुते (जामखेड), सुवर्णा राठोड (पाथर्डी), चांगदेव काकडे (राहुरी), दत्तु फुंदे (शेवगांव), गणेश गायकवाड (श्रीगोंदा), अनिता उगले (अकोले), संतोष मंगर (नेवासा), नवनाथ दिवटे (कर्जत), उर्मिला राऊत (न.पा.नोन.टीचिंग), दिलीप गंभीरे (अनुसूचित जाती जमाती), संतोष आंबेकर (अनुसूचित जाती जमाती), मनिषा गाढवे (महिला राखीव).