बाबुजी आव्हाड महाविद्यालयामध्ये अकरावी विद्यार्थ्यांचे स्वागत
पाथर्डी - प्रतिनिधी
पाथर्डी येथील बाबुजी आव्हाड महाविद्यालयात इयत्ता अकरावी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. गेली दोन वर्षे कोरोनामुळे विस्कटलेली शिक्षणाची घडी यावर्षी पुन्हा सुरळीत झाल्याने विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांमध्येही आनंदाचे वातावरण दिसून आले.
या स्वागत समारंभानिमित्त पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. बाबुजी आव्हाड महाविद्यालयात दैनंदिन अध्यापनाबरोबरच विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देणारे उपक्रम वर्षभर सुरु असतात, त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच या उपक्रमांमध्ये भाग घ्यावा. विद्यार्थ्यांनी कठोर मेहनत करून आई-वडिलांचे स्वप्न साकार करावे. सर्वांनी विविध स्पर्धेत व खेळात भाग घ्यावा. विशेषतः विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी व्यस्त वेळातून खेळासाठी वेळ द्यावा. आपल्या जीवनात महात्मा गांधीचा आदर्श घ्यावा. आयुष्यात यश संपादन करण्यासाठी जिद्द, चिकाटी, शिस्त हे गुण विद्यार्थ्यांनी अंगी बाळगावीत, असे प्रतिपादन अभय आव्हाड यांनी केले.
यावेळी प्रातिनिधीक स्वरूपात मरकड सागर, तरवडे श्रीकांत व बडदे मयुरी, दिवटे साक्षी यांचे स्वागत अभय आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आले .तसेच पालक प्रतिनिधी संतोष जिरेसाळ यांनी मनोगत व्यक्त केले. मयुरी बाबर, मयुरी जाधव, रेहान आतार या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी व्यासपीठावर प्राचार्य डॉ.जी.पी ढाकणे, पर्यवेक्षक प्रा.शेखर ससाणे, प्रा.सचिन पालवे, प्रा.अजित पालवे, प्रा.संदीप आमटे, प्रा. मन्सूर शेख, प्रा. सचिन शिरसाठ, प्रा.इंद्रजीत बोरले, प्रा.सचिन वनवे, प्रा.अभिजीत खेडकर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. देवेंद्र कराड तर आभार प्रा. सुधीर सुडके यांनी मानले.