महाराष्ट्र
कर्नाटकातील भीषण अपघातात अहमदनगरच्या पाच भाविकांचा मृत्यू ; तीन मुलं गंभीर जखमी
By Admin
कर्नाटकातील भीषण अपघातात अहमदनगरच्या पाच भाविकांचा मृत्यू ; तीन मुलं गंभीर जखमी
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
सोलापूर अक्कलकोट-गाणगापूर रोडवर (Akkalkot-Gangapur Road) कारचा भीषण अपघात ( Major Road Accident ) झाला आहे.
सर्व मृत आणि जखमी अहमदनगर येथील राहणारे आहेत. शुक्रवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास अफझलपूर तालुक्यात बळुर्गीजवळ हा भीषण अपघात झाला.
कारचा चक्कचूर!
MH 16 BH 5392 असा गाडीचा नंबर आहे. शिकाऊ चिन्ह असलेलं 'L' असं देखील गाडीच्या मागच्या काचेवर दिसून आलं आहे. डॅटसन गो प्लस या गाठीतून हे सर्वजण प्रवास करत होते. दरम्यान, गाडीनं समोरच्या बाजूनंच झाडाला धडक दिली आणि यात कारचा चक्काचूर झालाय. तर गाडीतील पाच जणांना जबर मार लागून त्यांचाही जागीच मृत्यू झाला आहे.
कर्नाटकातील गाणगापूर येथून देवदर्शन करून अक्कलकोटच्या दिशेने परत येणाऱ्या भाविकांच्या कारला भीषण अपघात होऊन त्यात चार महिलांसह पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य तीन मुले गंभीर जखमी झाली.
अहमदनगर येथील काही भाविक कुटुंबीयांसह अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात दर्शन करून, पुढे श्री दत्तात्रेयाचे स्थान असलेल्या गाणगापूर येथे दर्शनासाठी गेले होते. तेथील देवदर्शन आटोपून समाधानी ते अक्कलकोटच्या दिशेने परत निघाले होते. तेव्हा वाटेत बळुर्गी गावाजवळ त्यांच्या कारचे (एमएच १६ बीएच ५३९२) टायर फुटले आणि चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला झाडावर आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, त्यात कारमधील चार महिलांसह पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.
तर, गंभीर जखमी झालेल्या तीन मुलांना कलबुर्गी येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातातील मृत व जखमींची नावे सायंकाळी उशिरापर्यंत समजू शकली नाहीत. अफझलपूर पोलीस पुढील तपास करीत आहेत.
मृतामध्ये चार महिलांचा समावेश
अपघाताची माहिती मिळाल्यानंतर स्थानिकांनीच घटनास्थळी धाव घेतली. यानंतर स्थानिकांनी गाडीतील मृतदेह बाहेर काढलेत. मृतांमध्ये चार महिलांचा समावेश आहे. तर एक पुरुष चालकाचाही मृत्यू झाला आहे.
रक्तबंबाळ अवस्थेत गाडीतच प्रवाशांचे मृतदेह अडकून पडले होते. तर गाडी रस्ता साडून एका बाजूला कलंडली होती. गाडीच्या मागच्या आणि पुढच्या दोन्ही काचा फुटल्या होत्या. दरम्यान, आता पोलिस या अपघाताबाबत अधिक तपास करत आहेत. सध्या अपघातातील सर्व मृतदेह हे शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.
Tags :
49382
10