महाराष्ट्र
पाथर्डी तालुक्यातून पालखी सोहळ्यात भाविकांचे दागिने चोरणारे तिघे जण गजाआड,
By Admin
पाथर्डी तालुक्यातून पालखी सोहळ्यात भाविकांचे दागिने चोरणारे तिघे जण गजाआड, आरोपींकडून तब्बल 24 तोळे दागिने जप्त
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
संतश्रेष्ठ तुकाराम महाराज व संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यात पायी चालणाऱ्या भाविकांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने हिसकवणाऱ्या तिघांना गुन्हे शाखा युनिट सहाच्या पथकाने अटक केली.
आरोपीकडून तब्बल 24 तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असून एकूण 18 गुन्हे उघडकीस आणले आहेत. तर, हे चोरीचे दागिने विकत घेणाऱ्याला सुद्धा अटक करण्यात आली आहे.
शंकर शिवाजी पवार (23), महेंद्र सुरेश अरगडे (26), नितीन छगन काकडे (वय 22 वर्षे, रा. तिघेही, पाथर्डी, नगर) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्यांचे नावे आहेत. तर, त्यांच्याकडून चोरीचे दागिने विकत घेणाऱ्या प्रशांत छगन टाक (वय 26 वर्षे, रा, पाथर्डी) यालाही अटक करण्यात आली आहे. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज व संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा पुणे शहर परिसरात आला असता या घटना घडल्या आहेत. भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली असता चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरुन नेल्याच्या घटना घडल्या होत्या. याबाबत विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. गुन्हे शाखेकडून या गुन्ह्याचा तपास सुरू होता. यादरम्यान वारीमध्ये चोऱ्या करणारे दोघे संशयित आळंदी पुणे रोडवर थांबलेले असल्याची माहिती पथकाला मिळाली. यानुसार पोलिसांनी अरगडे आणि पवार याला ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी साथीदार काकडे याच्यासह संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या
पंढरपुरकडे जाणा-या पालखी मार्गावर भाविकांच्या गर्दीत सोन्याचे दागिने बळजबरीने चोरल्याचे सांगितले.
हे चोरलेले दागिने टाक या व्यक्तीला विकल्याचे देखील कबूल केले. यानुसार पोलिसांनी टाक याला पाथर्डी येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीचे एकून 24 तोळे वजनाचे 12 लाख 24 हजार रुपये किंमतीचे दागिने जप्त केले आहेत. आरोपींकडून एकूण 16 जबरी चोरीचे व 2 चैन चोरीचे असे एकुण 18 गुन्हे उघडकिस आलेले आहेत. ही कामगिरी गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश माने, पोलीस उपनिरीक्षक भैरवनाथ शेळके, अंमलदार मच्छिंद्र वाळके, विठठल खेडकर, शेखर काटे, अश्पाक मुलाणी, ज्योती काळे, सुहास तांबेकर यांनी केली आहे.
वारीमध्ये भाविकांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या तिघांना अटक केली. आरोपी हे मूळचे पाथर्डी येथील रहिवासी असून रेकॉर्डवरील आहेत. त्यांच्याकडून चोरीचे दागिने विकत घेणाऱ्याला देखील अटक केली आहे. त्यांच्याकडून एकूण 24 तोळे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
गणेश माने, पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, युनिट सहा.
Tags :
25767
10