महाराष्ट्र
2392
10
पाथर्डी तालुक्यातील 'या' गावात स्थानिक गुन्हे शाखेच्या धडक कार्यवाहीत २० लाखांचा मुद्देमाल जप्त
By Admin
पाथर्डी तालुक्यातील 'या' गावात स्थानिक गुन्हे शाखेच्या धडक कार्यवाहीत २० लाखांचा मुद्देमाल जप्त
अवैध रित्या गौण खनिजाची जेसीबी आणि ट्रॅक्टरच्या मदतीने चोरी करत असतांना दोघा आरोपींना ताब्यात
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील हनुमान टाकळी शिवारात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने टाकलेल्या धाडीत अवैध रित्या गौण खनिजाची जेसीबी आणि ट्रॅक्टरच्या मदतीने चोरी करत असतांना दोघा आरोपींना ताब्यात घेतले असून सदरील कारवाईत पोलीस पथकाने गुन्ह्याच्या तपास कामी २० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पाथर्डी तालुक्यातील हनुमान टाकळी येथील अवैध धंदया बाबत स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय बातमी मिळाल्या वरून स्थानिक गुन्हेशाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे,पो.कॉ.दत्तात्रय हिंगडे,पो.कॉ.संदीप पवार,पो.कॉ.संभाजी कोतकर, पो.कॉ.विनोद मासाळकर,बीट अंमलदार पो.कॉ अनिल बडे यांच्या पथकाने पंचासह दिनांक १३ नोव्हेंबर २०२२ रोजी नानी नदीपात्रात तीन ईसम, एका पिवळ्या रंगाच्या जेसीबीच्या साहाय्याने वाळु काढून ती एका ट्रॅक्टरमध्ये भरताना आढळून आले.सदर ठिकाणी पोलिस पथकाने छापा टाकुन तेथील जेसीबी चालक, ट्रॅक्टर चालक व मालक यांना जागीच ताब्यात घेवून त्यांचेकडे वाळु वाहतुकीबाबतच्या परवान्याबाबत विचारपुस केली असता त्यांनी त्यांचेकडे शासनाचा कोणताही वाळु वाहतुकीचा परवाना नसल्याचे त्यांनी सांगितले.
त्यावेळी पोलिसांनी त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव आरोपी १) बंडु शिवाजी बर्डे वय ३६ वर्षे रा हनुमान टाकळी ता पाथर्डी जि अनगर २) अक्षय दत्तात्रय मरकड वय २० वर्षे रा निवडुंगे ता पाथर्डी जि अ.नगर ३) दिलीप शिवाजी वांढेकर वय ३२ वर्षे रा जोडमोहोज ता पाथर्डी जि अ.नगर असे असल्याचे सांगितले व पोलिसांनी सदरील आरोपी कडून त्यांचे ताब्यात असलेला १५,००,०००/- लाख रुपये किमतीचा एक पिवळ्या रंगाचा जे सी.बी.त्याचा नं.एम.एच.२३ बी ६४०० तसेच ५,०००००/- पाच लाख रुपये किमतीचा एक फार्मट्रॅक कंपनीचा निळसर रंगाचा ट्रॅक्टर ट्रॉलीसह व त्यामध्ये ५,०००/- रुपये किमतीचे १ ब्रास वाळु असा एकूण एकुण २०,५,०००/- येणेप्रमाणे वरील वर्णनाचा मुद्देमाल गुन्ह्याचे कामी जप्त केला असून मुद्देमाल व आरोपींना ताब्यात घेतले व भा द वि कलम ३७९ व पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ चे
कलम ३,१५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सदरील कार्यवाहीने महसूल विभागाचा गौण खनिज चोरी बाबत असलेली उदासीनता उघड झाली असून पोलिसांनी केलेल्या कार्यवाहीने गौण खनिज माफिया मध्ये खळबळ उडाली आहे.
Tags :

