पाथर्डी तालुक्यातील डमाळवाडी येथे वीज पडून शेतकरी ठार
पाथर्डी- प्रतिनिधी
माणिकदौंडी – येथील डमाळवाडी येथे जनावरे चारण्यासाठी शेतात गेलेले शेतकरी राजू पटेल पठाण वीज पडून ठार झाले असून असल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पाथर्डी तालुक्याच्या बहुतांश भागात आज बरसलेल्या धुवाधार परतीच्या पावसाने शेती पिका सह वीज पडून मनुष्य हान झाली असून सोमवारी दुपार पासून सुरु असलेल्या जोरदार पावसाने बहुतांश जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार माणिकदौंडी परिसरातील डमाळवाडी येथे जनावरे चारण्यासाठी शेतात गेलेले शेतकरी राजू पटेल पठाण हे वीज पडून ठार झाले आहेत. दुपारी शेतात गेलेले राजू पठाण हे सायंकाळी ६ वाजे पर्यंत घरी परतले नाही म्हणून कुटुंबियांनी त्यांचा शोध घेतला असता ते शेतात वीज पडून मयत झाल्याच्या अवस्थेत आढळून आले. राजू पठाण यांची घरची परिस्थिती अत्यंत गरीबीची असून त्यांच्या पश्चात पत्नी,लहान मुलगा व दोन मुली असे कुटुंब आहे.या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.