ज्ञानेश्वर कारखान्यांचे तज्ञ संचालकपदी डॉ.क्षितिज घुले पाटील यांची नियुक्ती
अहमदनगर- प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्यांचे तज्ञ संचालक पदी शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ.क्षितिज नरेंद्र घुले पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर कारखान्यांचे संचालक मंडळाची सभा आज शनिवार दि.27 फेब्रुवारी रोजी अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांचे अध्यक्षतेखाली झाली.त्यात ही नियुक्ती करण्यात आली.
यावेळी कारखान्याचे संचालक माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील,उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग,संचालक अड देसाई देशमुख,विठ्ठलराव लंघे,काकासाहेब शिंदे,पंडितराव भोसले,प्रा.नारायण म्हस्के,भाऊसाहेब कांगुणे, जनार्धन कदम,शिवाजी कोलते,मच्छिद्र म्हस्के, बबनराव भुसारी,सखाराम लव्हाळे,दीपक नन्नवरे,लक्ष्मण पावसे यांचे सह
काशिनाथ नवले, अशोकराव मिसाळ,श्री.
जगदाळे,कार्यकारी संचालक अनिल शेवाळे,कामगर संचालक सुखदेव फुलारी,ए.बी.खरड, एम.एस.मुरकुटे,वर्क्स मॅनेजर एस.डी.चौधरी,डिस्टिलरी इंचार्ज महेंद्र पवार,कल्याण म्हस्के,के.एन. गायके,रवींद्र मोटे,विलास लोखंडे आदी उपस्थित होते.