पाथर्डी तालुक्यातील करंजी घाटात ट्रकचालकास लुटले
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील करंजी घाटात माणिक पीर बाबा दर्ग्याजवळ ट्रकचालकास मारहाण करून लुटल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. ट्रकचालक किसन नवनाथ मराठे (रा.मराठवाडी, ता. आष्टी, जि. बीड) याने पाथर्डी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, मंगळवारी रात्री साडेबाराच्या सुमारास करंजी घाट चढताना माणिकपीर बाबा दर्ग्याजवळ दुचाकीवरून आलेल्या तिघांनी ट्रकला दुचाकी आडवी लावली.
दोघांनी ट्रकमध्ये चढून चाकूने वार व लाकडी दांडक्याने मारहाण केली. या घटनेत 26 हजार 700 रुपये चोरीस गेेले. आरोपींच्या दुचाकीमागे'फुलपावर' असे लिहिले होते. एकाने साळवे असा नामोल्लेख केला. करंजीतील दोघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी ही घटना गांभीर्याने घेतली आहे.