संत रविदास महाराज जयंती निमित्त आडगावात अखंड हरिनाम सप्ताह
पाथर्डी प्रतिनिधी:
पाथर्डी तालुक्यातील आडगांव येथे भव्य दिव्य संत रविदास महाराज यांच्या ६४५ वी जयंती निमित्त सालाबाद प्रमाणे अखंड हरीनाम सप्ताह प्रारंभ दि.३ मार्च ते सांगता १० मार्च २०२२ पर्यत सप्ताह असुन मिडसांगवी येथील सालसिद्धबाबा देवस्थानचे मठाधिपती महंत ह.भ.प.हनुमंत महाराज शास्ञी यांची नुकतीच किर्तन सेवा झाली.
या किर्तनात घेतलेल्या अभंग सहित त्यांनी अनेक दृष्टांत सांगुन आजच्या युगात माणसाने कसे वागले पाहिजे, ही परिस्थिती सांगत तसेच आपण सर्व क्षेञासह आध्यात्मिक क्षेञात वळुन संत महंताचा आदर केला पाहिजे. आज ८ मार्च जागतिक महिला दिन. माता जिजाऊ भोसले,माता साविञीबाई फुले,माता रमाई आंबेडकर,माता आहिल्याबाई होळकर,माई सिंधुताई सपकाळ तसेच लता मंगेशकर अशा अनेक माता-भगिनींचा आपण आदर करत आहोत. अशाच प्रकारे आपण जर महिलांचा ८ मार्चलाच नव्हे तर वर्षभर आदर केला तर या जगात कुठेही आत्याचार होतांना दिसणार नाही.
असे अनेक दृष्टांग सहित स्पष्टीकरण देत किर्तन सेवेतून प्रबोधन केले. किर्तन सेवेनंतर आमटी- भाकरीचा महाप्रसादाचा कार्यक्रम झाला.
यावेळी पाथर्डी येथुन आलेले चर्मकार संघर्ष समितीचे युवक प्रदेश अध्यक्ष सुभाषराव भागवत यांचा सत्कार करण्यात आला.
या कीर्तन सेवेच्या प्रसंगी युवक प्रदेश उपाध्यक्ष सचिन नन्नावरे,जिल्हा उपाध्यक्ष संदिप शेवाळे,दिलीप बताडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी मुख्य आयोजक ह. भ. प. भारत कांबळे सह ग्रामस्थांच्या सहकार्यांने तसेच सदस्यांच्या परिश्रमाने कीर्तन सेवा सोहळा संपन्न झाला.