बाबुजी आव्हाड महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा
पाथर्डी- प्रतिनिधी
बाबुजी आव्हाड महाविद्यालयात हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनानिमित्त शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागाच्यावतीने विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी फॅट पर्सनस्टेज व बी एम आय तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.
या शिबिरात एकूण १५० जणांचे फॅट पर्सनस्टेज व बी एम आय ची तपासणी करण्यात आली. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी.पी.ढाकणे यांनी उत्तम आरोग्यासाठी खेळाचे महत्त्व विशद केले. प्रत्येकाने शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी खेळात भाग घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन डॉ. ढाकणे यांनी केले.
यावेळी प्रा.डॉ. सुभाष शेकडे, प्रा. दत्तप्रसाद पालवे, प्रा. डॉ. प्रशांत साळवे, प्रा. डॉ. अरुण राख आदी उपस्थित होते.
या राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या कार्यक्रमाचे संयोजन महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. विजय देशमुख व प्रा. सचिन शिरसाट यांनी केले.