महाराष्ट्र
भिमगीतांनी पाथर्डीकर झाले मंत्रमुग्ध;श्री तिलोक जैन विद्यालयात भीमगीत व भक्तीगीतांचा कार्यक्रम
By Admin
भिमगीतांनी पाथर्डीकर झाले मंत्रमुग्ध;श्री तिलोक जैन विद्यालयात भीमगीत व भक्तीगीतांचा कार्यक्रम
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी शहरातील श्री तिलोक जैन विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मोत्सव सोहळा व भगवान महावीर स्वामींच्या जन्म कल्याणक महोत्सवा च्या निमित्ताने श्री तिलोक जैन परिवार च्या वतीने भिम गीतांचा व भक्ति गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
प्रथत: डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भगवान महावीर स्वामी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माध्यमिक शिक्षक सोसायटीचे चेअरमन सुरेश मिसाळ, दिगंबर गाडे, रवींद्र आरोळे, बाबा राजगुरू, हुमायून आतार, अरविंद सोनटक्के, कैलास गजभिये, डॉ. सचिन गांधी, डॉ. अभय भंडारी, डॉ. संतोष तुपेरे, चांदमल देसर्डा, चर्मकार संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य युवक प्रदेशाध्यक्ष सुभाषराव भागवत तसेच प्राचार्य डॉ. शेषराव पवार, प्राचार्य सुभाष खेडकर, मुख्याध्यापक राजाराम माळी, पर्यवेक्षक दिलावर फकीर, विजयकुमार घोडके, संतोष चोरडिया आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमात गुरु आनंद संगीत मंडळातील प्रमुख श्री तिलोक जैन ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव सतिश गुगळे, गायक बिपिन खंडागळे, भारत गाडेकर, संजय राजगुरु, विशाल एकम यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा परिचय करून देणारी प्रबोधनपर भीमगीते आणि महावीर स्वामी यांच्या विचारांची महती विशद करणारी एकापेक्षा एक सुश्राव्य गीते यावेळी सादर केली. या गीतांनी पाथर्डीकर मंत्रमुग्ध झाले. या बहारदार संगीतमय कार्यक्रमाला सचिन साळवे यांनी सिंथेसायझर वर, राजेंद्र चव्हाण व महेंद्र शिंदे यांनी ढोलक वर तर अल्ताफभाई शेख यांनी ॲक्टोपॅडवर स्वर साथ दिली.
गेल्या सहा ते सात वर्षांपासून श्री तिलोक जैन विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त भीम गीतांचा कार्यक्रम होतो. या वर्षी मात्र आंबेडकर जयंती व महावीर जयंती एकाच दिवशी आल्याने आनंद संगीत मंडळाच्या भीमगीतांनी व भक्ती गीतांनी कार्यक्रमात रंगत चढली.
बिपिन खंडागळे यांनी गायलेले 'धम्मदीप हा मानवतेचा' 'उजाड राणी किमया केलीस मोठी' चांदाची चांदणी', भारत गाडेकर यांनी 'माणसा इथे मी तुझे गीत गावे' 'सुज्ञानाचा निर्मळ झरा' 'कायदा भिमाचा फोटो गांधीचा', संजय राजगुरु यांनी 'सोनियाची उगवली सकाळ' 'भिमसुर्य क्रांतीचा' तसेच विशाल एकम यांनी 'सरली निशा हसली उषा' 'दोनच राजे इथे गाजले' इत्यादी भीमगीते सादर केली. या गायलेल्या भिमगीतास रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळाली. 'राजा राणीच्या जोडीला पाच मजले माडीला' या भीमगितास वन्स मोर चा प्रतिसाद लाभला. मध्यंतर नसतानासुद्धा जवळपास तीन तास रसिक या मैफलीत दंग झाली होती.
प्रा. श्रीकांत काळोखे यांनी प्रास्ताविक तर पर्यवेक्षक विजयकुमार घोडके यांनी आभार मानले.
Tags :
64
10