श्री तिलोक जैन विद्यालयात स्वच्छता शपथ दिन साजरा
पाथर्डी प्रतिनिधी
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्वप्नातील भारत आज साकारत आहे. त्या अनुषंगाने श्री तिलोक जैन विद्यालयात १ सप्टेंबर हा दिवस स्वच्छता शपथ दिन म्हणून साजरा करण्यात आला.
विद्यालयातील सर्व विद्यार्थी , शिक्षक व सर्व कर्मचारी यांचा स्वच्छतेची शपथ देण्यात आली. मानव संसाधन विकास मंत्रालय तसेच शालेय शिक्षण व साक्षरता विभागाच्या वतीने १ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर हा कालावधी हा स्वच्छता पंधरवडा सर्वत्र साजरा होत आहे. स्वच्छतेच्या चांगल्या सवयी विद्यार्थ्यांनी तसेच नागरिकांनी अंगिकाराव्यात यासाठी विद्यालयाच्यावतीने २ सप्टेंबर हा दिवस जाणीव जागृती दिन म्हणून साजरा करण्यात आला. विद्यालयाच्या शिक्षिका सुजाता माने आणि मिनाक्षी बडे यांनी गुगल मीट द्वारे विद्यार्थ्यांना, पालकांना स्वच्छतेचे महत्व पटवून दिले.
या वेळी विद्यालयाचे प्राचार्य अशोक दौंड,पर्यवेक्षक अजय भंडारी, डॉ.अनिल पानखडे, सुनिल मरकड ,भाऊसाहेब मरकड,चंद्रकांत उदागे,अजिंक्य कांकरिया, सोहेल पठाण,अर्चना भोसे, मनिषा मोरे व सर्व विद्यार्थी आणि शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते