श्री क्षेत्र कानिफनाथ मढी देवस्थानच्या सर्वागीण विकासासाठी प्रयत्नशील- मरकड
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
देवस्थान समितीच्या अध्यक्ष पदी झालेली निवड सार्थ ठरवून देवस्थान समितीच्या विकासासाठी प्रयत्नशील राहणार असून भाविक भक्त यांना देवस्थान ठिकाणी असणाऱ्या अडचणी व समस्या सोडवण्यावर भर दिला जाणार आहे.देवस्थान परीसरात आलेल्या कोणत्याही प्रकारची भाविकांची गैरसोय होऊ दिली जाणार नाही.महा प्रसाद तसेच पुजा पाठ देवाची आरती नित्य नियम पाळून दररोज सुरू आहे. मंदिर परीसरात स्वच्छ राहील यांची काळजी घेतली जाईल.असे यावेळी अंबादास मरकड यांनी सांगितले.
पाथर्डी तालुक्यातील मढी येथील कानिफनाथ महाराज गड येथील देवस्थान समिती अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल श्री. बबन उर्फ राधाकिसन अंबादास मरकड यांचा सत्कार पञकार अमोलराजे म्हस्के,वजीर शेख,सुनिल नजन यांनी केला.यावेळी देवस्थान समिती सदस्य उपाध्यक्ष सचिन गवारे,भाऊसाहेब मरकड,सौ.विमल मरकड,अॕड.शिवजीत बलभिमराव डोके,डाॕ. विलास मरकड,अर्जुनराव शिरसाठ,अॕड.तानाजीराव धसाळ,रविंद्र आरोळे, संजय मरकड,शामराव मरकड व पदाधिकारी कर्मचारी उपस्थित होते.