महाराष्ट्र
29-Dec-2024
शिक्षकांच्या विविध प्रश्न साठी पाठपुरावा
महाराष्ट्र टीचर असोसिएशनच्या राज्याध्यक्ष यांचा मंत्रालय स्तरावर पाठपुरावा
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
राज्यातील नुकत्याच निवडून आलेल्या महायुती सरकारने विधानसभेच्या निवडणुकीआधी महायुती सरकारचे तात्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनाच्या दरम्यान मैदानावर येत आणि कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊन ज्या शाळा 20 टक्के, 40 टक्के, 60% अनुदान घेत आहेत त्या शाळांना अनुदानाचा पुढील टप्पा देणे व राहिलेल्या आघोषित शाळांना घोषित करून 20 टक्क्यावर अनुदानित करणे व ज्या शाळा त्रुटीतील शाळा होत्या व त्यांनी काही दिवसांपूर्वी त्या त्रुटी पूर्ण केलेल्या होत्या, परंतु त्या शाळा अगदी काहीतरी शुल्लक कारणाने अपात्र ठरवण्यात आल्या होत्या, अशा विनाकारण अपात्र करण्यात आलेल्या शाळांना देखील अनुदानाचा समान टप्पा देण्याच्या संदर्भात कॅबिनेटमध्ये निर्णय घेण्यात आलेला होता. व निवडणुकीनंतर अनुदानाचा पुढील टप्पा देण्याची युती सरकारने व तत्कालीन मा शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी सदनात जाहीर केले होते. त्यानंतर विधानसभा निवडणुका झाल्या व या निवडणुकीत महायुतीला भरघोस असं यश मिळालं आहे आणि नुकतेच महायुती सरकार तर्फे शिक्षण मंत्री देखील जाहीर करण्यात आले आहेत, पण गेल्या दहा दिवसात मंत्रिमंडळ व शिक्षण मंत्री घोषित होऊनही अद्याप महायुती सरकारने शिक्षकांना आश्वासन दिलेल्या प्रमाणे अनुदानाच्या पुढील टप्प्याची अद्याप अंमलबजावणी व त्रुटीतील शाळा, राहिलेल्या आघोषित शाळा यांचा निर्णय होऊन देखील त्या संदर्भात जीआर (शासन निर्णय) काढण्यात आला नाही