श्री कानिफनाथ माध्यमिक विद्यालयाचे चित्रकला स्पर्धेत घवघवीत यश
पाथर्डी प्रतिनिधी:
तालुक्यातील जवखेडे खालसा येथील श्री कानिफनाथ माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी चित्रकला स्पर्धेत मोठे यश मिळवले आहे.
२०२३ शासकीय रेखाकला परीक्षा इंटरमिजिएट निकाल ९७% लागला आहे. यामध्ये कु. मतकर समृद्धी राजेंद्र व कु. जाधव सायली संदिप या ए ग्रुप मध्ये तर कु. जमधडे अक्षदा दिलीप व कु. वाघ वेदांती नरेंद्र या दोघी बी ग्रुपने उत्तीर्ण झाल्या. तसेच ग्रेड सी मध्ये २५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
तसेच राष्ट्रीय मतदार दिवस (२५ जानेवारी) निमित्त तालुका स्तरीय चित्रकला स्पर्धेत मोठा गट माध्य. : कु. मतकर समृद्धी राजेंद्र ( इ. १० वी ) हिने प्रथम क्रमांक मिळवला. लहान गटात : चि. जाधव अथर्व रामनाथ ( इ. ८ वी ) याने प्रथम क्रमांक मिळवला आहे.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष उद्धवराव वाघ, संस्थेचे सर्व पदाधिकारी, प्राचार्य विक्रम नेहुल, पर्यवेक्षक भगवान गिरी व सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
या सर्व विद्यार्थ्यांना कलाशिक्षक संजय ससाणे व राजेंद्र मतकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.