नामदेव शिंपी समाजोन्नती परिषदेच्या तालुकाध्यक्ष पदी डॉ. सुहास उरणकर
पाथर्डी प्रतिनिधी:
नामदेव शिंपी समाजोन्नती परिषद, अहमदनगर या शिंपी समाजाच्या सामाजिक कार्य करणाऱ्या संघटनेच्या पाथर्डी तालुकाध्यक्षपदी पाथर्डी शहरातील डॉ. सुहास उरणकर यांची निवड करण्यात आली आहे. दि. १८ डिसेंबर २०२३ रोजी झालेल्या बैठकीत डॉ. उरणकर यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
यापूर्वी पाथर्डी शहराध्यक्ष म्हणून डॉ. उरणकर कार्यरत होते. त्यांच्या अध्यक्षपदाच्या कालावधीत शहरात अनेक सामाजिक, धार्मिक इ. कार्यक्रमांबरोबरच नामदेव महाराज मंदिर उभारणी सारखे अनेक सामाजिक कामे केलेली आहेत.डॉ. सुहास उरणकर हे ओ. बी. सी. संघटनेचे जिल्हाध्यक्ष, निमा संघटनेचेही तालुकाध्यक्ष, भाजप डॉक्टर सेल तालुका अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत.
त्यांच्या या निवडीबद्दल पाथर्डी शहरातील डॉक्टर, व्यापारी तसेच इतर सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.