एसटी बस थांब्यावर थांबली अन् महिलेने गमावली तीन तोळे सोन्यासह रक्कम
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
एस. टी. बसमध्ये प्रवास करणाऱ्या महिलेच्या पर्समधील तीन तोळ्यांचे दागिने व रोख रक्कम, असा ५७ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला. शेवगाव ते अहमदनगर प्रवासादरम्यान ही चोरी झाली.
याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुभांगी प्रमोद डाके (वय ५०, रा. शेवगाव) या १६ मे रोजी सकाळी ११ वाजता अहमदनगरला येण्यासाठी शेवगाव- कल्याण बसमध्ये बसल्या होत्या. त्यांनी पर्समध्ये तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण व सात हजार रुपये ठेवले होते. बस करंजी घाटात (ता. पाथर्डी) थांबली होती.
त्यावेळी पर्समध्ये दागिने व रोख रक्कम होती. त्या नगरमध्ये आल्यावर सावेडीतील गुलमोहर रस्ता भागात भावाच्या घरी रिक्षाने गेल्या. रिक्षाचे भाडे देण्यासाठी पर्स उघडल्यावर दागिने व रोख रक्कम चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.