पाथर्डी- प्रतिनिधी
राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने भारत सरकारने सुरू केलेले स्वच्छ भारत अभियान कोरडगाव ग्रामपंचायत आणि श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या संयुक्त विद्यमाने यशस्वीपणे पार पडले. 1ऑक्टोबर एक तास स्वच्छतेसाठी श्रमदान या जिल्हा परिषदेच्या उपक्रमांतर्गत हे स्वच्छता अभियान पार पडले. कोरडगावच्या लोक नियुक्त सरपंच सौ.साखरबाई नामदेव म्हस्के व श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान पार पडले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष रवींद्र उर्फ भोरु शेठ मस्के, श्री समर्थ रामदास स्वामी यांचे कोरडगाव येथील सर्व भक्तगण, कोरडगाव ग्रामपंचायत चे सर्व सदस्य, ग्रामपंचायतचे कर्मचारी, कोरडगाव आणि परिसरातील ग्रामस्थ, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी पर्यवेक्षिका सौ सोलाट मॅडम, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक,शिक्षिका व विद्यार्थी या अभियानात सहभागी झाले. कोरडगाव मुख्य चौकापासून स्वच्छता अभियानाला सुरुवात झाली. मुख्य पेठ, बाजार तळ, मंदिराचा परिसर, गावातील प्रमुख रस्ते यावेळी स्वच्छ करण्यात आले. यावेळी श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामपंचायत च्या सर्व कर्मचाऱ्यांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. कोरडगाव ग्रामपंचायत च्या वतीने श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांचे व समर्थ रामदास स्वामी भक्तगणांचे या मोहिमेत सहभागी झाल्याबद्दल आभार मानण्यात आले.