सत्यजित तांबे यांना स्वाभिमानी मराठा महासंघाचा जाहीर पाठिंबा अंकुश डांभे
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
नाशिक पदवीधर मतदार संघाचे अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांना स्वाभिमानी मराठा महासंघाच्या वतीने जाहीर पाठिंबा.
अहमदनगर जिल्हा अध्यक्ष अंकुश डांभे यांनी नुकताच जाहीर केला.
शेवगाव येथे स्वाभिमानी मराठा महासंघ जिल्हा कार्यकारिणीची बैठक नुकतीच पार पडली. या वेळी जिल्हा अध्यक्ष अंकुश डांभे यांनी सांगितले की, संघटनेचे संस्थापक डॉ. कृषीराज टकले यांचे नेतृत्व खाली राज्यात चांगले पद्धतीने वाटचाल सुरू आहे. बेरोगारांसाठी साठी सत्यजित तांबे यांच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होऊन पदवीधरांना न्याय देण्याचे काम तांबे करू शकतात. श्री. तांबे हे अहमदनगर जिल्ह्यातील असल्यामुळे मराठा समाजातील पदवीधरांचे प्रश्न सोडवतील. तांबे एक अभ्यासू व्यक्तीमत्त्व पदवीधरांना लाभू शकते. त्यामुळे स्वाभिमानी मराठा महासंघ अहमदनगर जिल्हा सत्यजित
तांबे यांना जाहीर पाठिंबा देत आहे.
अशी भूमिका जिल्हा अध्यक्ष अंकुश डांभे यांनी जाहीर केली.
या प्रसंगी जिल्हा सल्लागार अमोल म्हस्के, शेवगाव तालुका अध्यक्ष अनिल सुपेकर, तालुका कार्यध्यक्ष शरद थोटे, शहर अध्यक्ष अक्षय खोमणे, मराठा भूषण चंद्रकांत महाराज लबडे, प्रा. श्री. संजय अकोलकर, जिल्हा कार्य अध्यक्ष चंद्रकांत कराळे, राहुरी तालुका अध्यक्ष शरद खांदे, श्रीरामपूर तालुका अध्यक्ष अविनाश मुठे, किशोर लो ढे, सुदाम थोरे, मनीषा निमसे, सुधीर नागवडे, बाळासाहेब कोऱ्हळे, निलेश दरेकर, आदी उपस्थित होते.