महाराष्ट्र
2817
10
दहा हजार रुपये लाच घेताना महिला वैद्यकीय अधिकारी ॲन्टी करप्शनच्या जाळ्यात
By Admin
दहा हजार रुपये लाच घेताना महिला वैद्यकीय अधिकारी ॲन्टी करप्शनच्या जाळ्यात
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
कामाचा मोबदला आणि प्रोत्साहन भत्ता देण्यासाठी साडेचार हजार रुपये लाच घेतल्यानंतर पुन्हा 10 हजार रुपये लाच घेताना (Accepting Bribe) राहुरी तालुक्यातील बारागांव नांदूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या (Baragaon Nandur Primary Health Centre) महिला वैद्यकीय अधिकाऱ्याला (Medical Officer) अहमदनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Ahmednagar ACB Trap) सापळा रचून रंगेहात पकडले.
वैद्यकिय अधिकारी डॉ. वृषाली तुळशीराम सूर्यवंशी-कोरडे Dr. Vrishali Tulshiram Suryavanshi-Korde (वय-39) असे लाच घेताना रंगेहात पकडलेल्या महिला अधिकाऱ्याचे नाव आहे. अहमदनगर एसीबीने (Ahmednagar ACB Trap) ही कारवाई बुधवारी (दि.8) प्राथमिक आरोग्य केंद्र बारागांव नांदूर येथे आरोपीच्या केबीन मध्ये करण्यात आली. (Ahmednagar Bribe Case)
याबाबत राहुरी येथील समुदाय आरोग्य अधिकारी (Community Health Officer) महिलेने (वय-26) अहमदनगर एसीबीकडे (Ahmednagar ACB Trap) मंगळवारी (दि.6) केली होती. तक्रारदार या समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून नोकरीस असुन, त्यांचा ऑगस्ट व सप्टेंबर 2021 या दोन महिन्यांचा कामावर आधारित मोबदला व प्रोत्साहन भत्ता व ऑक्टोबर महिन्याचा प्रोत्साहन भत्ता मिळणे करिता तक्रारदार यांनी वैद्यकिय अधिकारी डॉ. वृषाली सूर्यवंशी-कोरडे यांची दोन महिन्यांपूर्वी भेट घेऊन विचारणा केली. त्यावेळी त्यांनी तुला मिळणारे रक्कमेच्या निम्मी रक्कम द्यावी लागेल असे सांगितले.
त्यानंतर मागील एक महिन्यापूर्वी तक्रारदार या पुन्हा आरोपी डॉ. वृषाली सूर्यवंशी-कोरडे यांना भेटल्या. त्यावेळी त्यांनी आता काहीतरी रक्कम दे तरच मी तुझे बिलासंबधी पुढील प्रोसेस करेन असे सांगितले. तक्रारदार यांनी नाईलाजाने जवळ असलेले साडेचार हजार रुपये त्यांना दिले. त्यानंतर 3 फेब्रुवारी रोजी तक्रारदार यांनी पुन्हा आरोपी डॉ. वृषाली सूर्यवंशी-कोरडे यांची भेट घेऊन बिलासंदर्भात विचारणा केली. आरोपीने पुन्हा बिलाचे निम्म्ये रकमेची मागणी केली व तडजोड अंती 10 हजार रुपये द्यावे लागतील असे सांगितले.
तक्रारदार यांना आरोपी डॉ. वृषाली सूर्यवंशी-कोरडे यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार मंगळवारी पंचासमक्ष केलेल्या पडताळणी मध्ये आरोपी डॉ. वृषाली सूर्यवंशी-कोरडे यांनी तक्रारदार यांचेकडे 10 हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून बुधवारी प्राथमिक आरोग्य केंद्र बारागांव नांदूर येथे लाचेचा
सापळा रचला. आरोपी डॉ. वृषाली सूर्यवंशी-कोरडे यांनी त्यांचे केबीन मध्ये तक्रारदार यांचे कडुन 10 हजार रुपये लाच स्विकारली असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर (SP Sharmistha Gharge-Walawalkar),
अपर पोलीस अधीक्षक नारायण न्याहळदे (Addl SP Narayan Nyahalde)
पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार (DySP Narendra Pawar) यांच्या मार्गदर्शनाखाली
अहमदनगर एसीबी पोलीस उपअधीक्षक हरिष खेडकर (DySP Harish Khedkar), पोलीस अंमलदार रविंद्र निमसे,
वैभव पांढरे, बाबासाहेब कराड, महिला पोलीस नाईक संध्या म्हस्के, चालक पोलीस हवालदार हरुन शेख यांच्या पथकाने केली.
Tags :

