कुसुमाग्रजांचे काव्य सर्वांच्या आयुष्यात खूप मोलाचे- डॉ. शेषराव पवार
श्री आनंद महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा
पाथर्डी- प्रतिनिधी
श्री तिलोक जैन ज्ञान प्रसारक मंडळाचे श्री आनंद महाविद्यालय पाथर्डी येथे मराठी भाषा गौरव दिन व वि.वा. शिरवाडकर याची जयंती या कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महवियालयाचे प्राचार्य डॉ .शेषराव पवार होते. अध्यक्ष स्थानावरून बोलतांना ते म्हणाले की, आपण सर्वांनी कुसुमाग्रजांचे काव्य वाचले पाहिजे.त्यांनी जे लिहिले ते आपणा सर्वांच्या आयुष्यात खूप मोलाचे आहे.तसेच मराठी भाषा व मराठी साहित्य वाचून समजून घेतले पाहिजे.मराठीचा वापर आपण सर्रास करणे गरजेचे आहे.
या कार्यक्रमाची सुरुवात वि. वा.शिरवाडकरांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. या प्रसंगी प्रा. डॉ. भाऊसाहेब घोरपडे,प्रा.बुधवंत,प्रा.डॉ.अमोल महाजन यांची भाषणे झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ.अमोल महाजन यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. जगदीश बुधवंत यांनी केले तर प्रा. डॉ.विजयकुमार जगदाळे यांनी आभार मानले.
या कार्यक्रमाला प्रा. सूर्यकांत काळोखे, प्रा.डॉ. अनिता पावशे, डॉ. जयश्री खेडकर तसेच महाविद्यालयाचे शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.