सहायक अभियंत्याने स्वीकारली 1 कोटीची लाच! एकाला अटक; दुसरा फरार
By Admin
सहायक अभियंत्याने स्वीकारली 1 कोटीची लाच! एकाला अटक; दुसरा फरार
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
लाचखोरीची प्रकरणे कमी न होता ती वाढतच चाललेली दिसत आहे. याआधी पाच हजार, पन्नास हजार, 10 लाख अशी लाचेची प्रकरणे समोर येत असत मात्र आता तब्बल एक कोटी रुपये लाचेचे प्रकरण उघडकीस आले आहे.
अहमदनगर एमआयडीसीच्या सहाय्यक अभियंत्याला तब्बल एक कोटी रुपयांची लाच घेताना नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. गायकवाड यास अहमदनगर – छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील शेंडी बायपास जवळ शुक्रवारी रात्री उशिरा लाच घेताना अटक करण्यात आली. या प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. एवढ्या मोठ्या पैशांची हेराफेरी होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
काय आहे प्रकरण ?
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या कारवाईबाबत माहिती दिली आहे. त्यानुसार, एमआयडीसी अंतर्गत ठेकेदाराने 100 mm व्यासाचे पाईप टाकण्याचे काम केले होते. या कामाच्या बिलाची मागणी ठेकेदाराने केल्यानंतर मागचे बिल आउट वर्डवर घेऊन तत्कालीन अभियंताचे स्वाक्षरी घेण्यासाठी सहाय्यक अभियंता अमित गायकवाड याने फिर्यादी ठेकेदार याच्याकडे एक कोटी रुपये लाचेची मागणी केली होती. त्यानुसार नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. दरम्यान नाशिक प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पथकाने सहाय्यक अभियंता गायकवाडला एक कोटी रुपयांची लाच घेताना अटक केली आहे.
कारवाईबाबत गोपनीयता बाळगण्यात आली होती. त्यानुसार शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू होती. आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे. यामुळे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणांमध्ये तत्कालीन अभियंता गणेश वाघ यांचा देखील 50 टक्के वाटा होता, अशी कबुली अटकेत असलेल्या अमित गायकवाड याने दिली आहे.
बिल 2 कोटी 66 लाख, लाचेची मागणी 1 कोटी –
अहमदनगर येथील एमआयडीसी अंतर्गत 100 mm व्यासाची पाईपलाईन टाकण्याचे काम केले होते. या कामाचे दोन कोटी 66 लाख 99 हजार 244 रूपयांचे बिल मिळावे, म्हणून सदर बिलांवरती तत्कालीन उपविभागीय अभियंता गणेश वाघ याच्या मागील तारखेचे आउटवर्ड करुन त्यावर त्याच्या सह्या घेवुन सदरचे देयक पाठविण्याचे मोबदल्यात गायकवाड याने स्वतःसाठी तसेच वाघ याच्याकरीता या बिलाचे कामाचे व यापुर्वीच्या अदा केलेल्या काही बिलांची बक्षिस म्हणुन एक कोटी रूपये लाचेची मागणी केली होती. याबाबत शासकीय ठेकेदाराने एसीबीकडे तक्रार केली.
अहमदनगर औद्योगिक वसाहतीत लोखंडी पाईपलाईन बदलण्याच्या कामांची सुरक्षा ठेव व अनामत रक्कम ठेकेदाराला परत करण्यासाठी एमआयडीसीच्या सहायक अभियंत्यास तब्बल १ कोटी रुपयांची लाच स्वीकारताना नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे.
तर, धुळे एमआयडीसीचा कार्यकारी अभियंता मात्र फरार झाला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने नगर आणि पुण्यातील संशतियांची घरे सील केली असून, संशयित लाचखोरांकडून मोठे गबाड पथकाच्या हाती लागण्याची शक्यता आहे.
विशेषत: भ्रष्टाचार निर्मूलनासाठी दक्षता सप्ताह सुरू असतानाच मोठी कारवाई झाल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस महासंचालक विश्वास नांगरे-पाटील यांनी नाशिक विभागाचे कौतूक केले आहे. (Nashik Crime Nagar MIDC Assistant Engineer Accepts 1 Crore Bribe One arrested Another fugitive)
अमित किशोर गायकवाड (३२, रा. राहुरी, जि. अहमदनगर) असे लाच स्वीकारणार्या नगर एमआयडीसीच्या सहायक अभियंत्याचे नाव आहे. तर ठेकेदाराने केले त्यावेळीचे व सध्या धुळे एमआयडीसीत कार्यकारी अभियंता असलेला गणेश वाघ हा फरार झाला आहे.
गायकवाड याच्या नगरमधील आणि फरार वाघ याच्या पुण्यातील घराची झडती सुरू असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस महासंचालक विश्वास नांगरे-पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
श्री. नांगरे-पाटील हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे सुरू असलेल्या दक्षता सप्ताहांतर्गत नाशिक विभागाचा आढावा घेण्यासाठी आले असता, प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी नाशिक परिक्षेत्राच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी, उपअधीक्षक नरेंद्र पवार यांसह पोलिस निरीक्षक स्वप्निल राजपूत, अंमलदार प्रभाकर गवळी, संदीप हांडगे, किरण धुळे, सुरेश चव्हाण यांनी बजाविलेल्या या कामगिरीचेही श्री. नांगरे-पाटील यांनी कौतूक केले.
अशी आहे कारवाई
छत्रपती संभाजीनगरमधील शासकीय ठेकेदार असलेल्या तक्रारदाराने अहमदनगर एमआयडीसीसाठी मुळा डॅम ते डेहेरे या एक हजार एमएम व्यासाची लोखंडी पाइपलाइन बदलण्याचे कंत्राट घेतले होते.
मंजूर निविदेनुसार ३१ कोटी ५७ लाख ११ हजार ९९५ रुपये रकमेवर ५ टक्क्यांप्रमाणे १ कोटी ५७ लाख ८५ हजार ९९५ रुपये अनामत रक्कम तर सुरक्षा ठेव म्हणून ९४ लाख ७१ हजार ५०० रुपये एमआयडीसीकडे जमा होते.
झालेल्या कामाचे अंतिम देयकानुसार २ कोटी ६६ लाख ९९ हजार २४४ रुपये ठेकेदाराला मिळावे, यासाठी सदरचे बिल मंजूर करण्यासाठी २० ऑक्टोबर रोजी एक कोटी रुपयांची लाच मागण्यात आली.
त्यानुसार गेल्या शुक्रवारी (ता.३) लाचखोर गायकवाड याने वाहनात (एमएच २० सीआर ७७७७) १ कोटी लाचेची रक्कम स्वीकारली. याप्रकरणी नगर एमआयडीसी पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तांत्रिक पुरावे
नगर एमआयडीसीत पूर्वी गणेश वाघ कार्यरत होता. सध्या वाघ धुळे एमआयडीसीत कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत आहे. सदरील कामाच्या बिलांवर वाघ याच्या सह्या घेऊन सदरची देयके मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात गायकवाड याने बक्षिसी म्हणून १ कोटींच्या लाचेची मागणी केली होती.
संगनमताने लाच घेण्यासाठी वाघ याने गायकवाड यास प्रोत्साहन केल्याचे तांत्रिक पुरावे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या हाती लागले आहेत. मात्र कारवाईची कुणकुण लागताच वाघ धुळ्यातून पसार झाला आहे. पथकाने वाघच्या पुण्यातील व गायकवाडच्या नगरमधील घरे सील केले आहेत.
राज्यात सर्वाधिक १४० सापळे व १९० लाचखोरांना अटक करून राज्यात अव्वल क्रमांकावर नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आहे. भ्रष्टाचारमुक्त समाज करणे हेच विभागाचे एकमेव उद्दीष्ठ आहे. त्यादृष्टीने नाशिकचे पथक उत्तम कामगिरी करते आहे."
- विश्वास नांगरे-पाटील, अपर पोलीस महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग.
16929
10





