भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्या गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेऊन सखोल चौकशी करण्यासंबधी पाथर्डीत भाजपचे आंदोलन
नगर सिटीझन live team-
भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्या महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेऊन सखोल चौकशी करण्यासाठी भारतीय जनता पार्टी पाथर्डी तालुका यांच्या वतीने व आमदार मोनिकाताई राजळे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले.
यावेळी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्याचे भटके-विमुक्त आघाडी अध्यक्ष श्री. अशोकजी चोरमले, प्रदेश सदस्य श्री. राजेंद्र दगडखैर, भारतीय जनता पार्टी पाथर्डी चे सरचिटणीस श्री जे.बी. वांढेकर, शहर अध्यक्ष श्री. अजय भंडारी, युवा मोर्चा अध्यक्ष श्री. सचिन वायकर, उपनगराध्यक्ष श्री. नंदकुमार शेळके, खरेदी विक्री संघाचे उपसभापती श्री. उत्तम गर्जे सर, सदस्य श्री. मधुकर काटे, उपसभापती श्री. रविंद्र वायकर, पंचायत समिती सदस्य श्री. सुभाष केकाण, नगरसेवक श्री. बजरंग घोडके, श्री. बबन बुचकूल, श्री. महेश बोरुडे, डॉ. अनिल बोरुडे, श्री. रमेश हंडाळ, सौ. मंगलताई कोकाटे, माजी जि.प. सदस्य श्री. भगवान साठे, श्री. नारायण पालवे, श्री. राम लाड व भारतीय जनता पार्टीचे आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.