वनदेव डोंगराला लागली अचानक आग ; निसर्गाचे मोठे नुकसान झाल्याबद्दल हळहळ
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील शहरालगत असलेल्या वनदेव निसर्ग पर्यटन केंद्रातील डोंगराला बुधवारी सायंकाळी सात वाजता अचालक आग लागून वन हद्दीतील निसर्गाचे मोठे नुकसान झाले.
जैवविविधता पशुपक्षी यासह वनस्पती व झाडे आगीत भस्मसात झाले. हा परिसर अनेकदा वन विभागाकडून दुर्लक्षित झाल्याने अशा घटना घडतात. त्यामुळे निसर्ग प्रेमींकडून घटनेबाबत हळहळ व्यक्त केली जात आहे. वनदेव डोंगर निसर्गरम्य येथे पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. याच सोबत येथे मद्यपी मधप्राशन करून नासधूस करतात. गैरकृत्य करणारे, तसेच गुन्हेगारी क्षेत्रातील लोक या ठिकाणी वास्तव्य करून चांगल्या निसर्ग परिसर केंद्राचा विनाश कसा होईल, अशी कृत्य त्यांच्याकडून होत आहे.
याबाबत सामाजिक क्षेत्रातून वेळोवेळी आवाज उठविण्यात आला. परंतु वनविभागाकडून या उपद्रव्य मूल्यांवर वेळीच कारवाई न झाल्यामुळे त्यांची मनोधैर्य वाढून या चांगल्या रमणीय ठिकाणची अशांतता पसरण्याचं काम होत आहे. बुधवारी सायंकाळी वनदेव डोंगरातील महादेव मंदिराजवळील डोंगराला आग लागली. आग लागून बराच वेळ उलटला तरी देखील वनविभाग अथवा स्थानिक पालिका प्रशासन या घटनेकडे फिरकले नाही. वन हद्दीतील वनस्पती तसेच वृक्षांचे नुकसान झाल्याने वृक्षप्रेमीांंमधून हळहळ व्यक्त होत आहे.