राजळे महाविद्यालयात काळी फीत लावून कामकाज आंदोलन
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव येथील दादापाटील राजळे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्राध्यापक संघटना स्थानिक शाखेतर्फे काळे फित लावून कामकाज आंदोलन करण्यात आले.अखिल भारतीय प्राध्यापक महासंघाच्या (AIPUCTO) ०८ जानेवारी, २०२३च्या बैठकीतील निर्णयाप्रमाणे दि १४ फेब्रुवारी, २०२३रोजी देशव्यापी काळी फित आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी न करणे, विद्यापीठ व महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर सेवकांच्या रिक्त जागा त्वरित भरणे, जुनी पेन्शन त्वरित लागू करणे, शिक्षणाचे खाजगीकरण थांबवणे, शिक्षणावरील खर्च जीडीपीच्या प्रमाणात वाढवणे, भारतीय विद्यापीठांना मोठ्या प्रमाणात अनुदान देण्यात येवून सशक्तीकरण करावे, परदेशी विद्यापीठांना प्रवेश नाकारण्यात यावे, सर्वांना मोफत व सक्तीचे शिक्षण देणे इत्यादी मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. स्थानिक शाखेचे अध्यक्ष प्रा. डॉ. अतुल चौरपगार, उपाध्यक्ष प्रा. डॉ. जनार्दन नेहुल, जिल्हा प्रतिनिधी प्रा. डॉ. सुभाष देशमुख, खजिनदार प्रा. डॉ. निर्मला काकडे , प्रा. डॉ. राजू घोलप, प्रा. डॉ. महेबुब तांबोळी, प्रा. डॉ. राजकुमार घुले, प्रा. डॉ. ज्ञानदेव कांडेकर, प्रा. डॉ. विलास बनसोडे, प्रा. डॉ. किशोर गायकवाड, प्रा. डॉ. साधना म्हस्के, प्रा. डॉ. गंगा लवांडे, प्रा. डॉ. रोहीत अदलिंग, प्रा. डॉ. जालिंदर कानडे, प्रा. अनिता पाटोळे, प्रा. मोहीनी कुटे, प्रा. देविदास गायकवाड, प्रा. डॉ. संजय भराटे, प्रा. रविंद्र बावस्कर, प्रा. डॉ. सुभाष देशमुख आदि या आंदोलनात उपस्थित होते.