कवडदरा विद्यालयाचे विज्ञान प्रदर्शनात यश,उपकरणाची जिल्हास्तरवर निवड
नाशिक - प्रतिनिधी
इगतपुरी तालुक्यातील कवडदरा येथील भारत सर्व सेवा संघ शिक्षण संस्थेच्या
न्यु इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज कवडदरा विद्यालयाने ४७ व्या इगतपूरी तालूका विज्ञान प्रदर्शनात मिळविले घवघवीत यश संपादन केले आहे.
दिव्याग माध्यमिक गटात प्रथम क्रमांक
कु.पुष्पा वाकचौरे (इयत्ता 10 वी) मिळवला असुन तीने बनवलेल्या उपकरणाची
राज्यस्तरासाठी निवड झाली आहे.तसेच
माध्यमिक गटात कच-याचे योग्य रित्या व्यवस्थापन ३आर गारबेज गुरू उपकरणाचा प्रथम क्रमांक मिळवला असून यामध्ये
कु.महेश गोडे,साहिल लोहरे,दत्ता फोकणे (12 वी विज्ञान) यांनी उपकरण बनवत यश मिळवले. असुन माध्यमिक गट शैक्षणिक साहित्य निर्मिती प्रथम क्रमांक मिळवला आहे.आदर्श विज्ञान शिक्षक पुरस्कार प्रमोद परदेशी यांना मिळाला आहे.यासाठी विशेष मार्गदर्शन श्रीराम लोहार,प्रमोद परदेशी,
कु.ज्योती पोपेरे या शिक्षकांनी केले.यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व बक्षिसे देण्यात आली.
या सर्व उपकरणांची दि.३ जानेवारी रोजी होणाऱ्या नाशिक जिल्हा विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे.विद्यालयाचे प्राचार्य विनोद कांबळे ,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्वांचे अभिनंदन व कौतूक केले आहे.