पाथर्डी व पारनेर तालुक्यातील 14 विद्यार्थ्यांना बारावीच्या परीक्षेत काॕपी करणाऱ्या विद्यार्थ्यांना रस्टीकेट
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
बारावी परीक्षेतील भौतिकशास्त्र्ा विषयाच्या पेपरमध्ये कॉपी करणाऱया 8 विद्यार्थ्यांना रस्टीकेट करण्यात आले आहे. तालुक्यातील विविध परीक्षा केंद्रांवर भरारी पथकाने ही कारवाई केली.
भौतिकशास्त्र्ााच्या पेपरला शिक्षणाधिकारी माध्यमिक अशोक कडूस यांच्या पथकाने पाथर्डी तालुक्यात 8, शिक्षणाधिकारी प्राथमिक भास्कर पाटील यांच्या पथकाने राहाता तालुक्यात 1 आणि पारनेरच्या गटविकास अधिकारी किशोर माने यांच्या पथकाने पारनेर तालुक्यात 6 कॉपी प्रकरणे पकडली आहेत. गटविकास अधिकारी डॉ. जगदीश पालवे यांनी एका विद्यार्थ्याला कॉपी करताना रंगेहाथ पकडून रस्टीकेट केले आहे.
पाथर्डी शहरातील श्री तिलोक जैन विद्यालयातील एक, कोरडगाव येथील हरिहरेश्वर विद्यालय परीक्षा केंद्रामधील सात, तर एम. एम. निऱहाळी विद्यालयातील परीक्षा केंद्रातील एका विद्यार्थ्याला रस्टीकेट करण्यात आले आहे. परीक्षेदरम्यान भरारी पथकाने केलेल्या झडतीत एकूण नऊ विद्यार्थी कॉपी करताना आढळून आले. भरारी पथकाची एण्ट्री होताच परीक्षा केंद्राच्या खोलीतून कॉपी फेकण्यात आल्यामुळे केंद्राच्या बाहेर कागदांचा खच साचला होता. 12वी परीक्षेत प्रशासनाने कॉपीमुक्त अभियान राबवित कडक पावले उचलली आहेत. जिह्यात 108 केंद्रांवर काल भौतिकशास्त्र्ााच्या पेपरला 35 हजार 824 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यातील 35 हजार 359 विद्यार्थी परीक्षेला हजर होते, तर 465 विद्यार्थ्यांनी दांडी मारली आहे.