पाथर्डी येथील बाबूजी आव्हाड महाविद्यालयात इंग्रजी प्रश्नमंजुषा ची स्पर्धा
पाथर्डी प्रतिनिधी
पाथर्डी येथील पार्थ विद्या प्रसारक मंडळाच्या बाबुजी आव्हाड कनिष्ठ महाविद्यालय मध्ये नुकतेच इंग्रजी प्रश्नमंजुषा (इंग्लिश क्विझ) चे आयोजन करण्यात आले.
कोरोना च्या संसर्गामुळे शाळा, महाविद्यालय ही मागील दीड वर्षापासून बंद होती. आता महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार कनिष्ठ महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना शालेय प्रवाहात समाविष्ट करण्याकरिता विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांना यु. पी. एस. सी , एम. पी . एस. सी., तसेच शासकीय स्पर्धा परीक्षाच्या धरती वरती विविध इंग्लीश विषयाशी संबंधित असलेल्या बहु पर्यायी प्रश्नाची रचना असलेले प्रश्न या क्विझ मध्ये विचारण्यात आले. स्पर्धा परीक्षा मध्ये इंग्लीश विषयाशी संबंधित प्रश्नांची अचूक ओळख असावी, ज्या व्दारे ग्रामीण भागातील विद्यार्थी या परीक्षेत सहज यशस्वी होतील, या उद्देशाने या 'इंग्लीश क्विझ' चे आयोजन करण्यात आले होते.
सदर स्पर्धेस विद्यार्थ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत प्रथम क्रमांक आरती हजारे हिने, द्वितीय क्रमांक (विभागून) प्रतीक्षा इंगवले, प्रियांका कोकाटे, तर तृतीय क्रमांक (विभागून) तेजस बडे, साक्षी उबाळे यांनी पटकावला.
स्पर्धेचे आयोजन प्रा. मन्सूर शेख यांनी केले.
या सर्व स्पर्धकांचे पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड, उपाध्यक्ष ॲड. सुरेश आव्हाड, प्राचार्य डॉ. जी. पी. ढाकणे, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. शेखर ससाणे यांनी अभिनंदन केले.