पाथर्डी- कोरडगाव येथे रस्ता रोको आंदोलन नुकसान भरपाईच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव येथील नानी नदीला आलेल्या अतिवृष्टीमुळे, पुरामुळे परिसरामध्ये कोळसांगवी, जिरेवाडी, तोंडोळी, कळसपिंपरी, नांदूर, सोनोशी, भुतेटाकळी, निपाणी जळगाव या भागांमध्ये शेती पिकाचे व पशुधन याबरोबरच व्यापारी वर्गाचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परंतु आज अखेर काही मिळाले नाही.
एक महिना होऊन सुद्धा शासनातर्फे अद्यापही मदत जाहीर झाली नाही, त्यामुळे राज्य शासनाचा निषेध करत कोरडगाव येथे वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कोरडगाव चौकात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांना आपत्तीच्या काळात वाऱ्यावर सोडणाऱ्या सरकारचा व लोकप्रतिनिधी चा धिक्कार करीत शेकडो कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून परिसर दुमदुमून टाकला. अतिवृष्टीने व पुरामुळे या परिसरामध्ये कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले असून, सदरचे पंचनामे व प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आले असून, लवकरच शासनातर्फे नुसकान भरपाई आल्यावर सदर चे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले जाते, असे माहिती कृषी अधिकारी सुधीर शिंदे यांनी दिली.
यावेळी मंडल अधिकारी दादासाहेब खेडकर ,कृषी सहाय्यक जगदीश शिरसाट, पर्यवेक्षक नारायण गर्जे, मंडळ कृषी अधिकारी मोहन राजपूत आंदोलनस्थळी उपस्थित होते. पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवला.
यावेळी आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष रवींद्र उर्फ भोरु म्हस्के, शेवगाव तालुका अध्यक्ष प्यारेलाल शेख, अरविंद सोनटक्के ,आकाश म्हस्के, आशीर्वाद कचरे, विठ्ठल मासाळ, बाळासाहेब म्हस्के, विनायक देशमुख, परबतराव देशमुख, बाळासाहेब मुखेकर, दादासाहेब रावतळे, सुदाम मुखेकर, विक्रम कसबे, सोमनाथ कसबे, मुखेकर बबन, संतोष कुसळकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.