HSC बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आताची मोठी बातमी आहे. परीक्षा तोंडावर असताना बारावी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. भाषा विषयाच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे.
5 आणि 7 मार्चला भाषा विषयाचे पेपर होणार होते, पण ही परीक्षा आता पुढे ढकलण्यात आली आहे. नवीन वेळापत्रकानुसार 5 आणि 7 एप्रिलला आता या विषयांचे पेपर घेतले जाणार आहेत.
5 मार्चला प्रामुख्याने हिंदी, जर्मन, जपानी, चीनी आणि पर्शियन या भाषा विषयांचे पेपर होणार होते, ते पेपर आता 5 एप्रिलला होणार आहेत.
तर 7 मार्चला मराठी, गुजराती, कन्नड, हिंदी, मल्याळम, तेलगु, पंजाबी, उर्दु, फ्रेंच अशा विषयांचे पेपर होणार होते, पण हे पेपर आता 7 एप्रिलला होणार आहे.
काही अपरिहार्य कारणास्तव पेपर पुढे ढकलण्यात आल्याची बोर्डाने माहिती दिली आहे. येत्या चार मार्चपासून बारावीची परीक्षा सुरु होत आहे.
बारावी आणि दहावीच्या लेखी व अन्य परीक्षेच्या उर्वरित वेळापत्रकामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. वेळापत्रकातील या अंशत: बदलाची सर्व संबंधित उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी तसेच विद्यार्थी, पालकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन राज्य शिक्षण मंडळाने केले आहे.
दरम्यान, वेळापत्रकात बदल झाला आहे. संगमनेर जवळ चंदनापुरी घाटातील अपघातात प्रश्नपत्रिका नेणारे वाहन आगीत जळुन भस्मसात झाले आहे. (Pune News) यात असणाऱ्या हिंदी आणि मराठीच्या प्रश्नपत्रिका या पूर्णपणे जळून खाक झाल्या आहेत. त्यामुळे परीक्षा तोंडावर असताना ही घटना घडली असल्याने बोर्डाने हा निर्णय घेतला आहे. (12th Time Table Changes) याप्रकरणी बोर्डाने एक बैठक घेत आणि हेच दोन पेपर एक महिना पुढे ढकलण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या बदलेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी असे आवाहन बोर्डाने केले आहे.