महाराष्ट्र
साईबाबा संस्थांनच्या प्रशासकीय अधिका-यासह ६ जणांना अटक
By Admin
साईबाबा संस्थांनच्या प्रशासकीय अधिका-यासह ६ जणांना अटक
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
शिर्डी येथे एका जुन्या प्रलंबित तक्रारीच्या चौकशीत आता संस्थानच्या प्रशाकीय अधिकाऱ्यासह सहा जणांविरुदध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडिया चॅनेलला पुरवून संस्थानाची बदनामी केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
साईबाबा मंदिराचे संरक्षण अधिकारी पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार शिर्डी पोलिस ठाण्यात साईसंस्थानचे प्रशासकीय अधिकारी राजेंद्र जगताप, सीसीटीव्ही विभागाचे प्रमुख विनोद कोते, कर्मचारी चेतक सावळे, सचिन गव्हाणे, सोसायटी कर्मचारी अजित जगताप व राहुल फुंदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा न्यायाधीश तथा साईसंस्थांन तदर्थ समितीचे अध्यक्ष आणि सदस्य यांच्या मंदिर भेटीचे सीसीटीव्ही फूटेज व्हायरल करून बदनामी केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या संस्थानचा कारभार पाहणाऱ्या तदर्थ समितीचे अध्यक्ष मुख्य जिल्हा न्यायाधीश आणि सदस्य सहायक धर्मादाय आयुक्त यांनी ३१ जुलै २०२१ रोजी मंदिर परिसराला भेट दिली होती. बैठक संपल्यानंतर त्यांनी मंदिर परिसरात उपाययोजनांची पाहणी केली. मात्र, त्यांच्या या पाहणीचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले. कोरोनाच्या नियमांचा भंग करून या पदाधिकाऱ्यांनी मंदिरात भेट दिली, दर्शन घेतले असे सांगत हे व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाले. सोशल मीडियातून तशा संबंधीच्या बातम्या प्रसारित झाल्या. या प्रकरणी चौकशीचा आदेश देण्यात आला. मात्र बराच काळ चालढकल सुरू होती. शेवटी सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी लक्ष घालून यासंबंधी न्यायालयात पाठपुरावा केला. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू झाली. त्यामध्ये प्रशाकीय अधिकऱ्यांसह सहा जण दोषी आढळून आले. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या अधिकाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांच्या पाहणीचे संस्थानच्या ताब्यातील फुटेज बाहेर खासगी व्यक्तींना पाठवून त्यासोबत चुकीचा आणि बदनामीकारक मजकूर प्रसारित केला, असा आरोप आहे.
Tags :
46648
10