इगतपुरी तालुक्यात महाराष्ट्र बंद मोठ्या प्रमाणात यशस्वी
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
उत्तरप्रदेश येथे शेतकऱ्यांचा नरसंहार करणाऱ्या आधुनिक जनरल डायर सरकारच्या निषेधार्थ इगतपुरी तालुक्यातील महाविकास आघाडीच्या वतीने घोटी शहरातील सर्व व्यापार बंद ठेवण्यासाठी केलेल्या सर्वपक्षिय आवाहनाला प्रतिसाद देऊन सर्व व्यापारी बांधवानी बंद पळाले या क्रूर घटनेचा निषेध करण्यात आला आहे सर्व सुज्ञ व्यापारी बंधूनी आपले दुकान बंद ठेवून निषेध व्यक्त केला याप्रसंगी महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते त्यानंतर काँग्रेसच्या वतीने या घटनेच्या निषेधार्थ "मौन व्रत" केले
याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव मा आमदार काशिनाथ मेंगाळ,मा आमदार शिवराम झोले,पं स सभापती सोमनाथ जोशी,काँग्रेसचे प्रदेश सचिव भास्कर गुंजाळ,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रामदास धांडे,राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष बाळासाहेब गाढवे,शिवसेना तालुकाप्रमुख भगवान आडोळे,जेष्ठ नेते जनार्दन माळी, पं स गटनेते विठ्ठल लंगडे,देवराम नाठे,बाळासाहेब वालझाडे,बाळासाहेब कुकडे,अरुण गायकर,नंदलाल भागडे,अरुण भोर, सुदाम भोर,पांडुरंग वारुंगसे,निवृत्ती कातोरे,ज्ञानेश्वर कडू,बाळासाहेब लंगडे,गणेश काळे,शिवा काळे,पांडुरंग शिंदे,वसंत भोसले यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते