महाराष्ट्र
254
10
मुंगूसवाडे येथील विद्यालयात विद्यार्थी शिक्षक पालक मेळाव्याचे आयोजन
By Admin
मुंगूसवाडे येथील विद्यालयात विद्यार्थी शिक्षक पालक मेळाव्याचे आयोजन
पाथर्डी- प्रतिनिधी
श्रावण भारती बाबा प्रशाला मुंगूसवाडे विद्यालयात विद्यार्थी-शिक्षक-पालक मेळावा नुकताच आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्यवस्थापन समितीचे जगन्नाथ गुळवे हे होते तर प्रमुख पाहुणे मुंगूसवाडे गावचे सरपंच प्रविण खेडकर होते.
प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक आप्पासाहेब इखे यांनी करून विद्यालयातील भौतिक सुविधा व विद्यार्थ्यांची प्रगती याविषयी मार्गदर्शन केले.
यावेळी सरपंच प्रविण खेडकर म्हणाले की, अनेक महिन्यापासून शाळा बंद होत्या. आता शाळा सुरु झाल्या आहेत. मधल्या काळात मुले घरात ऐकत नाहीत तसेच अभ्यास करत नाहीत, मोबाइल घेऊन अभ्यास न करता फक्त गेम खेळतात, अशा पालकांच्या अनेक तक्रारी होत्या. लॉकडाऊन नंतर आता कुठे सुरळीत जनजीवन सुरु आहे. नोकरी व शेतीचे काम यासह अनेक जबाबदाऱ्या पालकांना पार पाडाव्या लागतात. वेळ अपुरा पडतो.मुलांना मोबाईल हवा असतो व एकाच घरात दोन किंवा तीन पाल्य असतील, तर ते एकाच वेळी एकाच मोबाईल वर आँनलाईन अभ्यास कसा करणार किंवा बघणार हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता, परंतु आता शासननिर्णयानुसार शाळा सुरू झाल्यामुळे आता हा प्रश्न सुटला आहे. तरी शाळेच्या भौतिक सुविधांसाठी आम्ही पालक ,ग्रामस्थ सर्वपरीने प्रयत्न करु व विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण प्रगतीकडे शिक्षक- पालक या दोघांची ही जबाबदारी राहील असे स्पष्ट केले.
एकाचवेळी विद्यार्थी-शिक्षक-पालक मेळावा घेण्याचा दुग्ध शर्करा योग विद्यालयाचे मुख्याध्यापक आप्पासाहेब इखे व सर्व शिक्षकांनी जुळवून आणला.
माजी सरपंच राजेंद्र हिंगे यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी कशी लावावी, याविषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष व व्यावस्थापन समितीचे जगन्नाथ गुळवे यांनी सर्वशिक्षकांचे कौतुक केले, सर्वांना शुभेच्छा दिल्या व अध्यक्षीय समारोप केला. यावेळी माजी उपसरपंच आबासाहेब खेडकर, सदस्य नारायण बांगर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.तसेच इ.१०वी चे वर्गशिक्षक अरुणकुमार फुंदे यांनी मार्गदर्शन केले.
सुत्रसंचालन शिवाजी वारे यांनी केले तर आभार गहिनीनाथ खेडकर यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कलाशिक्षक किसन जगताप, संजय ढाकणे, संपत आंधळे भागवत गर्जे,नवनाथ आंधळे व इतर सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्यांनी प्रयत्न केले.
Tags :

