पाथर्डी - आगारातून 'इतक्या' एसटी बसच्या फेऱ्या सुरू
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी येथील एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात फूट पडत चालली असून, संपात सहभागी झालेले काही कर्मचारी कामावर हजर झाल्याने येथील पाच एसटी बसच्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत.
२७ ऑक्टोबर २०२१ पासून विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी संप सुरू झाल्यानंतर येथील सर्वच अधिकारी व कर्मचारी संपात सहभागी झाले होते. राज्यासह जिल्ह्यातील अनेक कर्मचारी कामावर हजर होत असतानाही, येथील आगारातून एकही बस धावत नव्हती. मात्र, आज चालक व वाहक असे मिळून दहा कर्मचारी कामावर हजर झाले. त्यांनी नगर, पुणे व पैठणच्या फेऱ्या सुरू केल्या. यापूर्वी सहा कर्मचाऱ्यांनी येथील आगार बंद असल्याने तारकपूर आगारात, तर दोन कर्मचाऱ्यांनी शेवगाव आगारात हजर होऊन काम सुरू केले आहे. याशिवाय कार्यशाळेतील जवळपास ५०, तर प्रशासकीय विभागातील १५ कर्मचारी यापूर्वीच कामावर हजर झाले असल्याने येथील संपात फूट पडत असल्याचे दिसून येत आहे.