धबधब्यावरुन उडी मारल्याने या ग्रामसेवकाचा मृत्यू
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
जामखेड येथुन बारा किलोमीटर अंतरावर असलेल्या पाटोदा तालुक्यातील सौताडा येथील रामेश्वरच्या धबधब्यावरून दरीत उडी मारल्याने ग्रामसेवकाचा मृत्यू झाला. झुंबर मारुती गवांदे (वय ५०) असे मयताचे नाव असून ते श्रीगोंदे येथील पंचायत समिती कार्यालयात कार्यरत होते. ही घटना २४ सप्टेंबरला सांयकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली.
घटनेची माहिती मिळताच पाटोदा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक पाटील व सौताडा येथील ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. यावेळी धबधब्याजवळ एक बॅग सापडली. ही मृत व्यक्तीची बॅग असून यामध्ये एक ओळखपत्र सापडले आहे. या ओळखपत्रावरून मयत व्यक्तीचे नाव हे झुंबर मारुती गवांदे असून ते श्रीगोंदे येथील पंचायत समितीमध्ये ग्रामसेवक म्हणून कार्यरत होते.
दरम्यान, दरीत पडलेला मृतदेह बाहेर काढण्यास अंधार पडल्यामुळे अडथळा निर्माण झाला. त्यामुळे उद्या सकाळीच दरीतून मृतदेह काढला जाणार असल्याचे सांगण्यात आले. सौताड्यात या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. वनविभागाने संरक्षणाच्या दृष्टीने उपाययोजना करण्याची गरज आहे, अशी मागणी गावकरी करत आहेत.