सीएनजी,पीएनजी गॕस महागणार
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडलेले आहे. आता सीएनजी आणि पीएनजीच्या दरात येत्या आॕक्टोबरमध्ये 10 ते 11 ट्नक्याने वाढण्याची शक्यता आयसीआयसीआय सिक्युरिटीजने व्यक्त केली. यामुळे सर्वसामान्यांना जेवण आणि प्रवासासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.
आयसीआयसीआय सिक्युरिटीजने अहवालात सांगितले की, सध्या गॅसचे दर 1.79 डॉलर्स एमएमबीटीयू आहेत. 1 ऑ्नटोबर ते 31 मार्च 2022 पर्यंत हेच दर 3.15 डॉलर्स होण्याची शक्यता आहे. तर रिलायन्स इंडस्ट्रीज आणि बीपीच्या केजी-डी6 मधून निघणाऱ्या गॅसचा दर 7.4 डॉलर्स एमएमबीटीयू असेल.
नैसर्गिक वायूपासून सीएनजी बनवला जातो. त्याचा वापर वाहनांसाठी तर पाईप गॅसचा वापर हा जेवण बनवण्यासाठी केला जातो. गॅसच्या मूळ किंमतीत वाढ झाल्यास शहरात गॅस वितरण कंपन्यांना आपल्या सीएनजी व पीएनजीच्या दरात वाढ करावी लागणार आहे. सीएनजी व पीएनजीच्या दरात 10 ते 11 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.