रिक्षा-कारच्या अपघातामध्ये एक ठार व तीघे जण जखमी
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
नेवासे : नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी पुण्याहून नेवासे फाटा येथे येत असतांना अॅटो रिक्षाला कारने पाठीमागून जोरदार दिलेल्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर होवून रिक्षामधील एक जण जागीच ठार, तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना नगर - औरंगाबाद महामार्गावरील माळीचिंचोरे शिवारात शनिवार सकाळी सहा वाजेच्या दरम्यान घडली.
पुणे (कोंढवा) येथून नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी नेवासे फाटा येथे अॅटो
रिक्षाने येत असतांना पाठीमागून येणाऱ्या कारने दिलेल्या जोरदार धडकेत झालेल्या भिषण अपघातात रिक्षाचा चक्काचुर होवून रिक्षामधील असिफ अब्दुलरज्जाक शेख हा जागीच ठार झाला, तर हैदरनुर शेख,वाहब अब्दुलरज्जाक शेख व मल्लिका अब्दुलरज्जाक शेख हे या अपघाता गंभीर जखमी झाले आहेत.जखमींवर नेवासा फाटा येथील एका खासगी दवाखाण्यात उपचार सुरु असून नेवासे पोलिस ठाण्यात मोहसिन मुमताजअल्ली सय्यद यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास नेवासे पोलिस करत आहेत.