महाराष्ट्र
नेवासा तालुका शिक्षक भारतीच्या सहविचारसभेचे आयोजन- संजय भुसारी
By Admin
नेवासा तालुका शिक्षक भारतीच्या सहविचारसभेचे आयोजन- संजय भुसारी
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
शिक्षक भारती संघटनेच्या नेवासा तालुका सहविचार सभेचे येत्या रविवारी त्रिमूर्ती संकुलाच्या दादासाहेब घाडगे पाटील विद्यालय त्रिमूर्तींनगर येथे दुपारी 12:30 वाजता आयोजन करण्यात आल्याचे नेवासा तालुकाध्यक्ष व शिक्षक भारतीचे जिल्हा कार्यवाह संजय भुसारी सांगितले सहविचार सभेप्रसंगी अहिरे के के राज्यसमनव्यक,नाशिक विभागाचे अध्यक्ष राजेंद्र लोंढे,सावित्री,फातिमा स्वास्थ्य केअर संबंधी कॅशलेस योजनेचे नरेंद्र पाटील, जिल्हाअध्यक्ष आपासाहेब जगताप, संघटनेचे राज्य सचिव सुनील गाडगे,साहेबराव तुपे नाशिक जिल्हाध्यक्ष ,बाबासाहेब लोंढे,महेंद्र आरु उच्च माध्य अध्यक्ष,उपाध्यक्ष सिकंदर शेख, महेश पाडेकर सचिव,योगेश हराळे,अशोक आन्हाड,महंमद सामी,शेवगाव तालुकाध्यक्ष कैलास जाधवउपस्थित राहणार आहेत.यावेळी नेवासा नवनिर्वाचित कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला जाणार आहे तसेच सहविचार सभेच्या वेळी पुढील विषयावर चर्चा होणार आहे 1)1नोव्हेंबर 2005 पूर्वी सेवेत असलेल्याना जुनी पेन्शन योजना लागू करावी 2)वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणी देताना 20% ची अट न घालता सरसकट वरिष्टवेतन श्रेणीप्रमाणे निवड श्रेणी देण्यात यावी 3) थकीत महागाई भत्ता व नियमित वेतन प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला अदा व्हावे 4) 20%40% अनुदानावर आलेल्या शाळांना पुढील अनुदान टप्पा तात्काळ घोषित करावा व अघोषित शाळा तुकड्या अनुदानासाठी घोषित कराव्यात 5) शिक्षक भारतीच्या आजीव सभासदांसाठी सावित्री, फातिमा कुटुंब स्वास्थ्य कॅशलेस योजनेची रेषा सर्वांसमोर मांडणे 6)थकीत मेडिकल बिले यांच्यासाठी निधी उपलब्ध व्हावा अशा विधिध मागण्यासंबंधी सहविचार सभेत चर्चा होणार आहे .शिक्षकांच्या हक्कासाठी व शिक्षकांच्या सन्मानासाठी शिक्षक भारती संघटना सदैव तत्पर राहणार असून राज्यस्तरीय प्रश्नांचे निराकरण संस्थापक आमदार कपिल पाटील यांच्या माध्यमातून केले जाणार आहे सहविचार सभा यशस्वी करण्यासाठी संघटनेचे संजय भुसारी अध्यक्ष,ज्ञानेश्वर काळे कार्याध्यक्ष नेवासा
राम कार्जुले प्राचार्य सोपानराव काळे ,प्राचार्य लक्षीमिकांत नांगरे, नबाब शहा ,सुरेश शेरे देवगाव तुकाराम फटांगरे,रामराव काळे, ,शेषेराव आहेर
गोरक्ष शिंदे ,जयंत पाटील सुनील पंडित,अर्जुन शिंदे,नितीन गडाख ,नवनाथ साळवे,दराडे सर , गंगाधर कर्डीले खजिनदार,सागर बनसोडे स सुनील इंगळे,रावसाहेब कर्जुले रावसाहेब ,गोवर्धन रोडे,संजय काळे , नानासाहेब घुले,चिंतामणी आहेर, सतीश सूरसे,नानासाहेब घुले
शरद कराड,ईश्वर देशमुख, नवनाथ सानप ,पोपट आवटे,पंढरीनाथ शेरकर,संजय चामुटे,दत्तात्रय गवळी,रंगनाथ सातपुते,बाबासाहेब रोडे,राजेंद्र नवगिरे,प्रयत्नशील आहेत
Tags :
288
10