श्री तिलोक जैन उच्च माध्यमिक विद्यालयात ऑनलाईन स्वागत सोहळा
By Admin
श्री तिलोक जैन उच्च माध्यमिक विद्यालयात ऑनलाईन स्वागत सोहळा
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी शहरातील श्री तिलोक जैन उच्च माध्यमिक विद्यालय हे एक नामांकीत विद्यालय असून या ठिकाणी सतत नवनवीन उपक्रम राबवले जातात. त्या अनुशंगाने डिजीटल तंत्रज्ञानाचा वापर करीत यु ट्युब लाईव्ह च्या माध्यमातून इ.११वी च्या मुलांचा स्वागत सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य अशोक दौंड हे होते, तर प्रमुख पाहुणे पाथर्डी पंचायत समिती ,पाथर्डी चे गट शिक्षणाधिकारी अभयकुमार वाव्हळ हे होते. या वेळी मंचावर कार्यालय प्रमुख महेंद्र राजगुरू, उच्च माध्यमिक विद्यालयाचे समन्वयक सुधाकर सातपुते उपस्थित होते.
या वेळी अध्यक्षपदावरून बोलताना प्राचार्य अशोक दौंड यांनी विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, गुगलमीट, टिचमिंट याचे महत्व विशद केले.११वी व १२ वी ची दोन वर्ष आयुष्याला कलाटणी देणारी असतात, त्यामुळे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन शिक्षणाकडे एक संधी म्हणून पहावे. प्रचंड मेहनत करून आपले ध्येय साध्य करावे, असे विचार व्यक्त केले.
गट शिक्षणाधिकारी अभयकुमार वाव्हळ यांनी विद्यालयाच्या उपक्रमाचे कौतुक करुन ऑनलाईन उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. या वेळी मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात चि. पठाण असदखान , कु. पटारे धनश्री , कु. पलक देसर्डा, कु. नाविण्या पटवा , कु. वाखुरे समिक्षा, चि. पालवे विजयराज या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देवून स्वागत करण्यात आले.
प्रा. प्रकाश लवांडे यांनी सर्व प्राध्यापकांचा परिचय करून दिला तसेच संस्थेची माहीती विशद केली. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक संध्या पालवे यांनी केले, तर सुत्रसंचालन, रविंद्र बुधवंत यांनी करून आभार समन्वयक सुधाकर सातपुते यांनी मानले. ऑनलाईन कार्यक्रमाचे तांत्रिक नियोजन संतोष घोगरे यांनी केले. या उपक्रमाचे श्री तिलोक जैन ज्ञान प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष चंपालालजी गांधी, सचिव सतिशजी गुगळे, खजिनदार सुरेशजी कुचेरिया, विश्वस्त धरमचंदजी गुगळे, राजेंद्रजी मुथ्था, डॉ. ललीतजी गुगळे या सह कार्यकारीणी मंडळ व सल्लागार मंडळाच्या सर्व सदस्यांनी विशेष कौतुक केले.