पाथर्डीच्या अजय बोरुडेची विनू मंकड क्रिकेट स्पर्धेसाठी निवड, महाराष्ट्र अंडर १९ संघाकडून खेळणार
पाथर्डी प्रतिनिधी:
पाथर्डी येथील युवा क्रिकेट पटू अजय बोरूडे यांची देशांतर्गत खेळल्या जाणाऱ्या आणि प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या विनू मंकड क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन ने अंडर-१९ गटात निवड केली आहे. २८ सप्टेंबरपासून या स्पर्धेला दिल्ली येथे सुरुवात होणार असून अजय बोरुडे महाराष्ट्र संघाकडून खेळणार आहे. या निवडीने पाथर्डी चे नाव देश पातळीवरील क्रिकेट विश्वात झळकले आहे.
अजय बोरुडे हा पाथर्डी तालुक्यातील पुरुष गटामध्ये महाराष्ट्र संघात खेळला जाणारा पहिला क्रिकेट खेळाडू ठरला आहे.
अजय बोरुडे हा एस. व्ही. नेट क्रिकेट अकॅडमी मध्ये गेली १५ वर्षापासुन प्रशिक्षक शशिकांत निऱ्हाळी यांचे कडून क्रिकेटचे धडे घेत आहे. कोणत्याही सुविधा उपलब्ध नसतांना पाथर्डी सारख्या दुष्काळी ग्रामीण भागातुन हा खेळाडु पुढे आला. पाथर्डी तालुका टि-२० क्रिकेट आसोशिएनचे अध्यक्ष अॅड. प्रतापकाका ढाकणे यांच्या अशिर्वादाने यशस्वीरीत्या चालू असलेल्या एस. व्ही. नेट क्रिकेट अॅकॅडमीचे या अगोदर महिला गटामध्ये ३ खेळाडु महाराष्ट्र राज्याच्या संघात खेळत आहेत. २ महिला खेळाडू विद्यापीठ तर ४ महिला खेळाडू स्कूल नॅशनल झाल्या आहेत. या सर्व यशस्वी खेळाडुंना पूढील वाटचाली साठी जिल्हापरिषद सदस्या सौ. प्रभावती प्रताप ढाकणे तसेच अहमदनगर जिल्हा क्रिकेट असो.अध्यक्ष अरुणकाका जगताप यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. अहमदनगर जिल्ह्यातुन या खेळाडूंवर व एस. व्ही. नेट क्रिकेट अॅकॅडमीवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.