पाथर्डी- 'या' गावात कर्ज वाटप मेळावा
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी : सकारात्मकदृष्टी, प्रामाणिक कष्ट आणि ध्येयाकडे जाण्यासाठी सातत्यपुर्वक केलेले प्रयत्न यामुळे महिलांनी आर्थिक स्वावलंबन मिळविल आहे. बँका ह्या ठेवीदारांच्या पैशातून कर्ज वाटप करीत असतात. बँका कर्ज
देत नाहीत अशी परिस्थिती नाहीच. बँका प्रामाणिक कर्जदाराच्या शोधात आहेत. महिला बचत गट आणि पिक कर्ज फेडणारे ग्राहक हे आमचे दैवत असल्याचे प्रतिपादन अहमदनगर जिल्ह्याचे सेंट्रल बँकेचे क्षेत्रीय व्यवस्थापक रुद्र दत्त यांनी केले.
मोहोजदेवढे येथे एकता महिला ग्रामसंघ मोहोज देवढे, एकात्मता पुरुष स्वयंसहायता गट, ग्रामंपचायत व सेंट्रलबँक शाखा पाथर्डीच्या वतीने महिलाबचत गट व शेतक-यांना पिक कर्ज वाटपाचा मेळावा
आयोजित करण्यात आला होता. यावेळी जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक प्रकाश शेंडे, मुख्य व्यवस्थापक सी. मंगलम,उमेदचे जिल्हा अभियान प्रमुख सोमनाथ जगताप, गितांजली काटकर, पाथर्डीचे शाखा व्यवस्थापक विवेक काळे,