पाथर्डी लोक न्यायालयात बॕकेची अनेक प्रकरणे निकाली
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी : तालुका विधी सेवा प्राधिकरणा तर्फे पाथर्डी येथील न्यायालयात नुकतेच लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले. त्यास पाथर्डी शहरातील व तालुक्यातील नागरीकांनी मोठा प्रतिसाद दिला. भारतीय स्टेट बँक, बँक ऑफ महाराष्ट्रच्या खातेदारांनी या लोक न्यायालयात सहभाग घेतला.
भारतीय स्टेट बँकेचे यावेळी सहा प्रकरणे निकाली निघाले. त्यात सुमारे चार लाख तेवीस हजार रुपये ची वसुली झाली. तर बँक ऑफ महाराष्ट्राच्या २० सभासदांचे प्रकरणान तडजोड होऊन दोन लाख पन्नास हजार रुपये वसुल झाले. या लोक न्यायालयामुळे प्रलंबील प्रकरणे मार्गी लागल्यामुळे शहर व तालुक्यातील खातेदारांनी समाधान व्यक्त केले. भारतीय स्टेट बँकेचे मुख्य व्यवस्थापक शदर बाविसकर व बँक ऑफ महाराष्ट्राचे क्षेत्रीय मुख्य प्रबंधक हरीशंकर वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेच्या अधिकाऱ्यांनी वसुलीसाठी विशेष मोहीम राबवली. त्यास ॲड प्रतिक वेलदे व ॲड.आत्माराम वांढेकर यांनी सहकार्य केले.