पाथर्डी तालुक्यात लसीकरणाचा वेग वाढवण्याची आरोग्य मंञी राजेश टोपे यांना मागणी
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष चंद्रकांत मरकड यांनी जालना येथे आरोग्य मंत्री नामदार राजेश टोपे साहेब यांची कामानिमित्त भेट घेतली. तसेच यावेळी पाथर्डी तालुक्यात लसीकरणाचा वेग वाढवा अशी मागणी केली असुन तालुक्यातील लसीकरण केंद्रावर गैर प्रकाला आळा बसविण्यात यावा.आॕनलाईन नाव नोंदणी असल्या प्रमाणे लसीकरण करण्यात यावे.तसेच 18 ते 44 वयोगटातील लोकांना लवकरात लवकर लसीकरण करावे.अशी मागणी नामदार आरोग्य मंञी राजेश टोपे यांना केली.
तसेच श्री कानिफनाथ देवस्थान ट्रस्ट मढी येथे आरोग्य उपकेंद्र द्यावी अशी मागणीही निवेदन देऊन केली आहे. यावेळी चंद्रकांत मरकड यांच्यासह भानाभाऊ मरकड ग्रामपंचायत सदस्य मढी, सतिष शेळके, इरफान शेख तसेच इतर सदस्य यांनी श्री क्षेत्र मढी देवस्थान येथील कानिफनाथ महाराज यांचा फोटो भेट म्हणून दिला.यावेळी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.