धक्कादायक! चीनच्या 'त्या' लॅबमधूनच कोरोनाचा फैलाव? वाचा खास रिपार्ट
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी - 24 मे 2021, सोमवार
जगात कोरोना विषाणू नेमका कुठून आणि कसा पसरला, याचं नेमकं उत्तर अद्याप मिळालेलं नाही. मात्र चीनच्या वुहानमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होत्या. वुहानमधील एका प्रयोगशाळेतून कोरोनाचा विषाणू पसरल्याचा संशय अनेकांना आहे, याबाबत माहीतीही मिळाली आहे.
अमेरिकेच्या एका प्राप्त अहवालानुसार, चीनने जगासमोर करोनाची माहिती जाहीर करण्याआधी नोव्हेंबर 2019 मध्ये वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या (WIV) तीन कर्मचाऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
वॉल स्ट्रीट जर्नलच्या रिपोर्टच्या माहीतीनुसार, तिन्ही कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनासारखी लक्षणं होती. यामध्ये अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या रिपोर्टचा उल्लेख करण्यात आला आहे. नोव्हेंबर 2019 नंतरच डिसेंबर-जानेवारीदरम्यान जगाला कोरोना महामारीची माहिती मिळाली होती.
रविवारी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) पथकातील एका सदस्याने फेब्रुवारी महिन्यात केलेल्या दौऱ्यात वुहानमधील प्रयोगशाळेतून संसर्ग झाल्याची शक्यता नाकारली होती, याकडे लक्ष वेधलं होतं.
वॉल स्ट्रीट जर्नलच्या रिपोर्टवर प्रतिक्रिया देताना परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिका अद्यापही लॅब लिक थिअरीचा प्रचार करत असल्याचं म्हटलं आहे. "खरंच कुठून फैलाव झाला याची माहिती मिळवली जात आहे की लक्ष हटवलं जात आहे," अशी विचारणाही त्यांनी केली आहे.