कासार पिंपळगावात कोविड-19 माझे गाव माझी जबाबदारी अंतर्गत कुटुंब सर्वेक्षण
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी - 30 एप्रिल 2021
पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव येथे शासन आदेशा प्रमाणे कोविड-19 माझे गाव माझी जबाबदारी सर्वेक्षण काम सुरू झाले आहे. तालुक्यात परीसरात तसेच गावोगावी दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.यामुळेच कुटुंब सर्वेक्षण होतणे अत्यंत गरजेचे आहे.लवकर निदान- लवकर उपचार हा या मोहिमेचा उद्देश असल्याने कोविड-19 ची लक्षणे असलेल्या सर्व व्यक्ती या सर्वेक्षणातून समजतील तसेच कोरोनाची साखळी तोडण्यास मदत होत आहे.
माझे गाव पूर्ण मुक्त गाव अभियान अंतर्गत माझे कुटुंब माझी जबाबदारी सर्वेक्षणाचे काम कासार पिंपळगाव अंतर्गत गावठाण व सर्व वाड्या वस्त्यावर होत असून या सर्वेक्षण कामात आशा सेविका अंगणवाडी सेविका ताई ग्रामपंचायत कर्मचारी यांचा सक्रिय सहभाग आहे.
या पथकामध्ये ताप,खोकला,दम लागणे, पल्स रेट 100 पेक्षा जास्त असणाऱ्या व्यक्तीची नोंद घेतली जात आहे.
या सर्वेक्षणात
आशा सेविका सुनीता राजळे, वैशाली शेळके, आंगणवाडी सेविका- रंजना सोनवणे, कविता काळे, सुलभा मुरदारे, मंगल शेळके, रेशमा पायमोडे, सविता बर्डे, मंगल बाबर, मीरा पवळे सुनीता पायमोडे,ग्रामपंचायत सदस्य आप्पासाहेब राजळे
ग्रामपंचायत कर्मचारी तुकाराम कांबळे, संतोष लवांडे, अशोक तिजोरे या व्यक्तीचा सहभाग आहे.
गावातील सर्व नागरिकांचे माझे कुटुंब माझी जबाबदारी अंतर्गत सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. ज्या कुटुंबातील व्यक्तींना कोरोना सदृश्य लक्षणे आढळतील त्यांनी तात्काळ सर्वेक्षण करणाऱ्या व्यक्तीस माहिती द्यावी.
ग्रामविकास अधिकारी
प्रमोद म्हस्के
कासार पिंपळगाव
ता- पाथर्डी