महाराष्ट्र
18211
10
चिंचपूर ईजदे येथे भरला बाल आनंदी बाजार
By Admin
चिंचपूर ईजदे येथे भरला बाल आनंदी बाजार
पाथर्डी प्रतिनिधी:
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचपूर ईजदे येथे शनिवारी आनंदी बाजार हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, या कार्यक्रम चे अध्यक्ष श्री रामनाथ कराड, अधिक्षक शालेय पोषण आहार तथा विस्तार अधिकारी शिक्षण यांनी भूषवले. कार्यक्रम साठी सरपंच श्रीमती पुष्पाताई मिसाळ, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष श्री जालिंदर खेडकर, श्री देविदास बडे, सुनिल शिरसाट व मुकुंद दहिफळे उपस्थित होते.
आनंदी बाजार मेळावा मध्ये
भाजी घ्या भाजी, टवटवीत भाजी ,फळे घ्या ,पेरू, पपई ,केळी घ्या ,गरमागरम वडा ,भजे ,चटकदार भेळ ,पाणीपुरी ,पॅटीस, गुलाबजाम ,इडली घ्या... अशी आठवडे बाजाराची आठवण देणाऱ्या वातावरणात पाथर्डी तालुक्यातील चिंचपुर इजदे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बाल आनंदी बाजार मोठ्या उत्साहात पार पडला . आजच्या आनंदी बाजार मधून चिमुकले विद्यार्थी मार्फत तब्बल ₹ पंचवीस हजार ची उलाढाल झाल्याचे शाळेतील तंत्र स्नेही उपक्रमशील शिक्षक श्री प्रसाद भिसे यांनी सांगितले.
कार्यक्रम च्या प्रारंभी महामानव भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार घालून आनंदी बाजार सुरुवात झाला. या प्रसंगी जवाहर विद्यालय यांचे विद्यार्थी शिक्षक वृंद व रुक्मिणीबाई फुंदे माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी व शिक्षक वर्ग पालक ,ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवीत चिमूरड्यांचा उत्साह द्विगुणित केला. तालुक्यातील चिंचपूर येथे प्राथमिक शाळेत शाळा व्यवस्थापन समिती तर्फे आयोजित बाल आनंदी बाजार मोठ्या उत्साहात पार पडला.
यावेळी जवाहर विद्यालयचे मुख्याध्यापक श्री.बाळासाहेब खेडकर, चिंचपूर इजदे गावच्या सरपंच सौ. पुष्पाताई मिसाळ यांनी आनंदी बाजाराला उपस्थित दर्शवली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सर्व सदस्य ,पालक, ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले. आनंदी बाजाराच्या यशस्वीतेसाठी संगमनेर डायटचे अधिव्याख्याता श्री मुकुंद दहिफळे यांचे विशेष सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुशिला बांगरे ,सौ. गीता गाडेकर, प्रसाद भिसे यांनी केले. अतिशय सुंदर आनंदी बाजार चे नियोजन केले बद्दल शाळेचे सर्व शिक्षकांचे शालेय शिक्षण समिती अध्यक्ष सदस्य व ग्रामपंचायत चिंचपूर इजदे सरपंच व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.
अहिल्यानगर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी व सर्वांगीण विकासासाठी अनेक नाविन्य उपक्रम राबववत आहे. या मध्ये क्रीडा स्पर्धा, विविध गुणदर्शन स्पर्धा, बाल चित्रकला स्पर्धा, मिशन आरंभ उपक्रम, इस्रो शैक्षणिक सहल, दप्तरमुक्त शनिवार अशा विविध नावीन्यपूर्ण उपक्रम मधून विद्यार्थ्याचा सर्वागीण विकास होतो. आनंदी बाजार सारख्या उपक्रमातून विद्यार्थ्यांना गणिती व्यवहार, नफा-तोटा, वैचारिक भावना व्यक्त होतात, अशा उपक्रमात पालकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे.
--रामनाथ कराड,
शिक्षण विस्ताराधिकारी
Tags :
18211
10




