महाराष्ट्र
16383
10
सिन्नर, इगतपुरीत सर्वाधिक एकल महिला; कारण काय?
By Admin
सिन्नर, इगतपुरीत सर्वाधिक एकल महिला; कारण काय? वाढत्या संख्येच्या कारणांचा जिल्हा परिषदेकडून शोध सुरू
सिन्नर न्यूज नेटवर्क-
जिल्हा परिषदेमार्फत जिल्ह्यातील एकल महिलांच्या स्थितीचे सर्वेक्षण करण्यात आले असून, या सर्वेक्षणात तब्बल ९४ हजार ९८५ एकल महिलांची नोंद झाली आहे. यामध्ये सिन्नर आणि इगतपुरी तालुक्यांमध्ये सर्वाधिक एकल महिला आढळल्याचे समोर आले आहे.
त्याखालोखाल निफाड आणि येवला तालुक्यांचा क्रमांक लागतो. या तालुक्यांमध्ये एकल महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्यामागील कारणांचा शोध जिल्हा परिषदेकडून घेतला जात आहे.
सर्वेक्षणात विधवा, परित्यक्ता, घटस्फोटीत आणि प्रौढ कुमारिका अशा विविध श्रेणींमध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे. नोंद झालेल्या महिलांपैकी ५५ वर्षांवरील एकल महिलांची संख्या लक्षणीय असून, ती ५८ हजार ६९४ इतकी आहे, तर ५५ वर्षांखालील महिलांची संख्या सुमारे ३६ हजार आहे. विशेष म्हणजे, सिन्नर आणि इगतपुरी तालुक्यांमध्ये नऊ हजारहून अधिक एकल महिलांची नोंद झाली आहे.
निफाड आणि येवला तालुक्यांमध्ये सुमारे ८,५०० महिलांची नोंद झाली आहे. या तालुक्यांमध्ये औद्योगिक क्षेत्रे, नोकरीच्या संधी आणि शहरांचे समीपत्व यामुळे महिलांचे स्थलांतर अधिक प्रमाणात होत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यामुळे एकल महिलांची संख्या या भागात जास्त असल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. पुढील काळात इतर सामाजिक, आर्थिक आणि कौटुंबिक कारणांचाही सखोल अभ्यास करण्यात येणार आहे. दुसरीकडे दिंडोरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यांत सर्वात कमी एकल महिला असल्याचे सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे.
करोनानंतर अनेक कुटुंबांनी आपल्या 'आधारवडा'स गमावले असून, त्याचा परिणाम म्हणून जिल्ह्यात विधवा महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जिल्ह्यात ८९ हजार ३७४ विधवा महिलांची नोंद करण्यात आली आहे. पुनर्वसन कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात एकल महिलांना आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देण्याचे कार्य हाती घेतले जाईल. त्यासाठी महिलांना ग्रामपंचायतींकडे बोलावून जन्मदाखले, अधिवास, ओळखपत्रे, तसेच आवश्यक शासकीय कागदपत्रे तयार करून देण्यासह पात्र महिलांना निराधार पेन्शनचा लाभ मिळवून देण्यात येणार आहे.
सर्वेक्षणात इगतपुरी आणि तालुक्यात सर्वाधिक एकल महिला असल्याचे आढळले आहे. शहराजवळ असल्यामुळे महिलांचे या तालुक्यांत स्थायिक होण्याचे प्रमाण वाढले आहे. इतर सामाजिक व आर्थिक कारणांचाही शोध घेतला जात आहे, अशी माहिती जिल्हा परिषद, मुख्य कार्यकारी अधिकारी, ओमकार पवार यांनी दिली.
जिल्ह्यात तब्बल ८९ हजार विधवा

Tags :
16383
10