महाराष्ट्र
11592
10
शेती माल उत्पादन प्रक्रिया उद्योगात मोठ्या संधी
By Admin
शेती माल उत्पादन प्रक्रिया उद्योगात मोठ्या संधी-डाॕ.हरिभाऊ मोरे
स्वर्गीय दादापाटील राजळे (भाऊ) हे दूरदृष्टीचे व्यक्तिमत्व
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्याचे भाग्यविधाते, श्री.वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना लि. व श्री दादापाटील राजळे शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सहकारमहर्षी स्व.दादापाटील राजळे यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त स्मृती व्याख्यानमालेच्या तिसऱ्या व समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे डॉ. हरिभाऊ मोरे मा. अधिष्ठाता महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, प्राचार्य कृषी महाविद्यालय सोनई, यांनी स्व. दादापाटील राजळे (भाऊ) यांच्या स्मृतीस उजळा दिला. व्याख्यानमालेचा समारोप, शेती - उद्योजक, चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर सह्याद्री फार्म नाशिक येथील श्री विलास शिंदे यांनी 'शेतीतील संधी व उद्योजकता' या विषयावर व्याख्यान दिले. आपल्या व्याख्यानात त्यांनी पुढे असे सांगितले की, अन्न ही पायाभूत गरज आहे. शेती माल उत्पादन प्रक्रिया उद्योगात मोठ्या संधी उपलब्ध आहेत. योग्य ती संधी शोधून, ग्राहकांची अपेक्षा व मागणी यावर अभ्यास करून, विचार करून शेती उत्पादकता वाढवावी. जगातील प्रत्येक घडामोडींचा परिणाम आपल्यावर होत असतो. म्हणून बारकाईने या गोष्टीचा अभ्यास करावा. स्वतःच्या करिअर बद्दल अनिश्चित तरुण गोंधळलेल्या परिस्थितीत आहेत. आर्थिक दरी निर्माण होताना मागासलेपणा व सामाजिक दरी वाढत जाताना दिसते. महाराष्ट्रात सर्वात जास्त मराठवाडा विभाग विदर्भ विभाग येथे शेतकरी आत्महत्या होतात. आर्थिक विकासावर सामाजिक व शैक्षणिक परिस्थिती अवलंबून असते. शेतीकडे नकारात्मक दृष्टीने पाहू नका. क्रॉपिंग पॅटर्न चेंज करायला हवा. युवकांनी डोळसपणे व शास्त्र शुद्ध पद्धतीने आपल्या स्वतःकडे पाहिले पाहिजे व सुधारणा केल्या पाहिजेत. ग्राहकांना जे अपेक्षित आहे त्याचा अभ्यास करून शेती उत्पादकता वाढवावी. त्याचबरोबर शेतीवर मालावर प्रक्रिया उद्योग कसे उभारता येतील याकडे तरुणांनी लक्ष केंद्रित करावे. युवकांनी आपली मानसिकता बदलली पाहिजे. युवक उद्योजक या विषयी त्यांनी अनेक उदाहरणे दिली. आपल्या ओघवत्या वाणीत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी आमदार मोनिकाताई राजळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. राजधर टेमकर यांनी केले तर आभार प्राचार्य अशोक काळे यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.राजेंद्र इंगळे व डॉ. किशोरकुमार गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष व स्व. सौ. चंद्रभागाबाई दादापाटील राजळे सर्व सेवाभावी संस्था, आदिनाथ नगर या संस्थेचे अध्यक्ष श्री शिवाजीराव राजळे यांनी सांगितले की, अशा व्याख्यानमालेतून युवकांशी संवाद घडतो व त्यांच्याशी विचार विनिमयाची संधी प्राप्त होते. युवकांनी आपली कौशल्य विकसित केले पाहिजेत, तसेच योग्य उद्दिष्टे ठेवून स्व कष्टाने ते साध्य केले पाहिजे. तसेच युवकांसाठी एक स्वतंत्र प्रात्यक्षिक लॅब उभारण्याची संकल्पना मांडली.
कार्यक्रमासाठी राहुलदादा राजळे, रामकिसन काकडे, डॉ. विनायकराव हाडके, उद्धवराव वाघ , सुभाषराव ताठे सुभाष बोर्डे, विक्रमराव राजळे, महेश शेळके, बाबासाहेब किलबिले, बापूसाहेब भोसले, पोपटराव आंधळे, भास्करराव गोरे, काकासाहेब शिंदे, संदीप पठाडे, संदीप लोखंडे, सुनील पुंड, शहाने सर,अधिक्षक श्री विक्रम राजळे,अविनाश कृषी विकास प्रतिष्ठानचे निरीक्षक भाऊसाहेब आठरेसर, प्राचार्य शांताराम खणगे, प्राचार्य सुनील पानखडे, मुख्याध्यापक अशोक काळे, व्याख्यानमालेचे नियोजनासाठी डॉ. आसाराम देसाई, डॉ. किशोर गायकवाड यांचेसह, संस्थेतील सर्व शिक्षक- शिक्षकेतर वृंद यांचे योगदान लाभले. परिसरातील कार्यकर्ते, नागरिक- पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags :
11592
10




